Kishor Aware : बापाच्या अपमानाचा बदला! किशोर आवारेंच्या हत्येचं कारण समोर
आवारे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी माजी नगरसेवक भानुदास खळदे यांचा मुलगा गौरव खळदे याला शनिवारी (13 मे) अटक केली. किशोर आवारे हत्या प्रकरणात तो मुख्य सूत्रधार असल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT

-कृष्णा पांचाळ, पिंपरी चिंचवड
Pune Crime news : जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे हत्या एक मोठी माहिती समोर आली आहे. आवारे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी माजी नगरसेवक भानुदास खळदे यांचा मुलगा गौरव खळदे याला शनिवारी (13 मे) अटक केली. किशोर आवारे हत्या प्रकरणात तो मुख्य सूत्रधार असल्याची माहिती समोर आली असून, पिंपरी चिंचवडचे एसीपी पद्माकर घनवट यांनी ‘मुंबई Tak’शी बोलताना महत्त्वाची माहिती दिली.
माजी नगरसेवक आणि जनसेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची तळेगाव नगरपरिषदेसमोर हत्या करण्यात आली. कोयत्याने 21 वार आणि 3 गोळ्या झाडत आवारेंना निर्घृणपणे मारण्यात आलं. यात आवारे यांचा जागेवरच मृत्यू झाला. याप्रकरणात आवारे कुटुंबीयांनी पोलिसांत फिर्यादी दिली होती. त्यात राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्यावरही आरोप करण्यात आला. सुनील शेळके यांनी हत्येचा निषेध करत आरोप फेटाळून लावले.
किशोर आवारेंची हत्या : पोलिसांना तपास काय मिळालं?
या प्रकरणी पिंपरी चिंचवडचे एसीपी पद्माकर घनवट यांनी माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार भानुदास खळदे आणि किशोर आवारे हे जनसेवा पार्टीचे नगरसेवक होते. भानुदास खळदे यांची तळेगाव नगरपालिकेच्या हद्दीत एक स्कीम सुरू होती. त्यासाठी रोड करताना झाडं तोडण्यात आली होती.