Pune News : दहावीच्या परीक्षेत 75 टक्के गुण मिळूनही विद्यार्थ्यानं स्वत:ला संपवलं! मित्रांचं काय आहे कनेक्शन?
Umand Londhe Suicide News : राज्यात दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. पण काही विद्यार्थ्यांच्या पदरात निराशाही पडली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

दहावीच्या परीक्षेत 75 टक्के गुण मिळाले, पण त्या विद्यार्थ्यानं जीवन संपवलं

नैराश्यात गेल्यानं विद्यार्थ्यानं उचललं टोकाचं पाऊल

अपेक्षित गुण मिळाले नाही म्हणून केली आत्महत्या
Umand Londhe Suicide News : राज्यात दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. पण काही विद्यार्थ्यांच्या पदरात निराशाही पडली. ज्या विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळालं, त्यांनी केक कापून निकालाचा दिवस साजरा केला. परंतु, पिंपरी-चिंचवडमध्ये एका विद्यार्थ्यानं टोकाचं पाऊल उचलत स्वत:चं आयुष्य संपवलं.उमंग लोंढे असं या विद्यार्थ्याचं नाव आहे.
नैराश्यात गेल्यानं विद्यार्थ्यानं उचललं टोकाचं पाऊल
मित्राला आपल्यापेक्षा जास्त गुण मिळाले आणि मला अभ्यास करूनही फक्त 75 टक्के गुण मिळाले, असं म्हणत 16 वर्षाच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मनासारखे गुण मिळाले नाहीत, म्हणून हा मुलगा प्रचंड नैराश्यात गेला होता. याच नैराश्यातून विद्यार्थ्याने जीवन संपवण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. उमंग लोंढे असं आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव आहे. या दुर्देवी घटनेमुळं पुण्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा >> Mumbai Tak Chavdi : 'योग्य वेळी चांगली बातमी येईल...', शिवसेना UBT- मनसे युतीवर संजय राऊतांचं मोठं विधान!
मिळालेल्या माहितीनुसार, ही खळबळजनक घटना पिंपरी-चिंचवडमध्ये वाल्हेकर वाडी परिसरातील शिवने कॉलोनी येथे घडली. उमंगने गळफास घेतल्याचं माहित होताच त्याच्या वडिलांनी त्याला अक्षय केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण रमेशची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आले.
परंतु, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास घडली. उमंगच्या मित्रांना 80-90 टक्के गुण मिळाले. उमंगला 75 टक्के गुण मिळाले. या नैराश्यातून उमंगने टोकाचं पाऊल उचलत स्वत:चं जीवन संपवलं.