झाडाच्या खोडातून पाणी येऊ लागलं आणि लोकांनी हळद कुकुं वाहिलं, PCMC ने सत्य कसं समोर आणलं?

मुंबई तक

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) अधिकाऱ्यांनी तात्काळ हस्तक्षेप करत यामागील सत्य उघड केलं. बी प्रादेशिक कार्यालयाचे उपअभियंता प्रवीण धुमाळ यांनी घटनास्थळी भेट देऊन स्पष्ट केलं की....

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पिंपरी चिंचवडमध्ये झाडाच्या खोडातून आलं पाणी

point

खोडातून येणारं पाणी पाहून सगळेच हादरले

Pune Crime News : पिंपरीच्या प्रेमलोक पार्क परिसरात शुक्रवारी एक वेगळाच प्रकार पाहायला मिळाला. एका गुलमोहराच्या झाडाच्या खोडातून पाणी येताना दिसलं आणि सगळेच आवाक झाले होते. शेकडो स्थानिक रहिवाशांनी आश्चर्यचकित होत गर्दी केली होती. अनेकांनी याला दैवी चमत्कार म्हटलं, पण नंतर सत्य समोर आलं.

हे ही वाचा >> ईदच्या दिवशी बकरी नव्हे, स्वत:च्याच मानेवरून फिरवला चाकू..यामागचं कारण वाचून हादरूनच जाल!

भूमिगत पाण्याच्या पाइपलाइनच्या गळतीमुळे घडलेली घटना होती. ही घटना सायंकाळी 7 ते रात्री 11 या वेळेत सहारा सोसायटीजवळील मुख्य रस्त्यावर घडली. या दृश्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. यामध्ये लोकांनी भक्तिभावाने झाडाला हळद, कुंकू आणि हार अर्पण केल्याचंही दिसलं. मुलं पाण्यात खेळत होती, तर वृद्ध लोक या घटनेला पवित्र पाणी असल्याच्या चर्चा करत होते.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) अधिकाऱ्यांनी तात्काळ हस्तक्षेप करत यामागील सत्य उघड केलं. बी प्रादेशिक कार्यालयाचे उपअभियंता प्रवीण धुमाळ यांनी घटनास्थळी भेट देऊन स्पष्ट केलं की, हा कोणताही चमत्कार नाही. “झाडाखालील एक जुनी पाण्याची पाइपलाइन गळत आहे. या गळतीमुळे पाणी झाडाच्या पोकळ खोडातून बाहेर पडत आहे,” 

हे ही वाचा >> टोल कर्मचाऱ्याला चिरडून ट्रक चालक पळाला... विसापूर टोल नाक्यावरचा धडकी भरवणारा CCTV व्हिडीओ

महानगरपालिकेने तात्काळ पाणीपुरवठा बंद करून दुरुस्तीचे काम सुरू केलं. झाड काढण्याऐवजी सावधगिरी बाळगण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. “झाडाला हानी न पोहोचवता गळती दुरुस्त केली जाईल,” असं धुमाळ यांनी नमूद केलं.

एका स्थानिक रहिवाशाने सांगितलं, “झाडातून पाणी वाहताना पाहून आम्हाला आश्चर्य वाटले. हा दैवी चमत्कार वाटला, पण अभियंत्यांनी कारण स्पष्ट केल्यानंतर सर्व काही समजले.” 

हे वाचलं का?

    follow whatsapp