Honeymoon ला जाण्याआधी ज्योतिषीने दिलेला इशारा..तरीही सोनम आणि राजाने ऐकलं नाही अन् नको ते घडलंच!

मुंबई तक

Raja-Sonam Honeymoon Case :  इंदौरचे राजा रघुवंशी आणि सोनम हनिमून केसमध्ये नवीन अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात ज्योतिषीचं कनेक्शन उघड झाल्याने एकच खळबळ माजली आहे.

ADVERTISEMENT

Raja And Sonam Murder Mystery
Raja And Sonam Murder Mystery
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कामाख्या मंदिरात दर्शन घेतल्यानंतर राजा-सोनमसोबत काय घडलं? 

point

ज्योतिषीने राजा आणि सोनमला कोणता सल्ला दिला होता?

point

त्या धबधब्यावर राजाचा मृतदेह सापडला अन्..

Raja-Sonam Honeymoon Case :  इंदौरचे राजा रघुवंशी आणि सोनम हनिमून केसमध्ये नवीन अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात ज्योतिषीचं कनेक्शन उघड झाल्याने एकच खळबळ माजली आहे. सोनमच्या वडिलांचं म्हणणं आहे की, दोघांनीही ज्योतिषाचं ऐकलं नाही. ज्योतिषीने लग्नाच्या दीड महिन्यापर्यंत घरातून बाहेर निघण्यास मनाई केली होती. सोनमचे वडिल देवी सिंह रघुवंशीचं म्हणणं आहे की, दोघांनीही आसामला जाण्याचा प्लॅन केला होता, याबाबत त्यांना ऐनवेळी माहित झालं. आसामच्या कामाख्या देवी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर त्यांचा विरोधात हत्येचा कट रचला गेला, असा संशय व्यक्त होत आहे. 

कामाख्या मंदिरात दर्शन घेतल्यानंतर काय घडलं? 

सोनमच्या वडिलांनी सांगितलं की, आसामच्या कामाख्या मंदिरात दर्शन घेतल्यानंतर दोघेही हॉटेलमध्ये गेले होते. तेव्हा त्यांना कुणीतरी शिलाँगला जाण्याचा सल्ला दिला. या हत्येमागे याच लोकांचा हात असू शकतो. दोघांनाही ज्वेलरी घातली होती आणि त्यांच्याकडे रोख रक्कमही होती.

हे ही वाचा >> पतीला नव्हती आवडत सावळ्या रंगाची पत्नी, पत्नीसोबत केलं 'असं' काही की...

ज्योतिषीने काय म्हटलं?

सोनमच्या वडिलांनी म्हटलं की, सोनम 5 जूनला माहेरी येणार होती. 21 मे रोजी समजलं की, दोघेही दिल्लीहून फ्लाईट पकडून आसामला जात आहेत. ज्योतिषांनी लग्नपत्रिकेत सोनमच्या विदाईची तारीख 5 जून सांगितली होती. ज्योतिषीच्या सांगण्यावरूनच सोनमच्या वडिलांनी घराच्या दरवाज्यावर मुलीचा उलटा फोटो लावला होता.

जेणेकरून ती परत येईल. हनिमून हत्या प्रकरणात कुटुंबियांनी धक्कादायक खुलासा केला आहे. सोनमच्या सासूने तिच्यासोबत जेव्हा शेवटचा संवाद केला, तेव्हा ते दोघेही कॅफेतून बाहेर निघाले होते. ज्या ठिकाणी त्यांची स्कूटी मिळाली. घटना घडल्यानंतर कॅफेत काम करणारा व्यक्तीही गायब आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सासूने सोनमला विचारलं, तू काही खाल्लस का..यावर ती म्हणाली, इथे काही मिळत नाही. एका जागेवर दूध मिळाला, त्या ग्लासमध्ये खूप जास्त पाणी मिक्स केलं होतं. सोनमने सासूला सांगितलं की, ते दोघे तिथे धबधबा पाहायला जात आहेत.

हे ही वाचा >> 13 व्या वर्षी शोषण सुरू झालं, थेट 27 व्या वर्षी न्याय मिळाला... चिअर गर्लला न्याय कसा मिळाला?

धबधब्याजवळ सापडला मृतदेह

2 जून रोजी राजाचा मृतदेह वेईसावडॉन्ग धबधब्याजवळ सापडला. पण सोनमचा काहीच पत्ता लागला नाही. दोघांचाही अपघात झाला आहे, असं सुरुवातीला म्हटलं जात होतं. परंतु, पोस्टमार्टम रिपोर्टनुसार उघडकीस आलं की, राजाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला आणि सोनम बेपत्ता झाली. 

हे वाचलं का?

    follow whatsapp