सोशल मीडियावर मैत्री केली, भेटायला बोलावलं आणि नशेच्या गोळ्या देऊन... पुण्यातील संतापजनक प्रकार

मुंबई तक

विमानतळ पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार, 34 वर्षीय महिलेला अनुराग शर्मा (वय 23) याने सोशल मीडियावर सोशल मीडियावर संवाद साधून विश्वास संपादन केला.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आधी सोशल मीडियावर मैत्री केली

point

37 वर्षीय महिलेशी नंतर जवळीक वाढवली

point

तरूणानं नशेच्या गोळ्या देत महिलेशी...

Crime News : सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत महिलेला ब्लॅकमेल करून तिच्याकडे खंडणी मागण्याचा आणि पाठलाग करून विनयभंगाचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. याप्रकरणी विमानतळ आणि हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सोशल मीडियावरून ब्लॅकमेलिंगचा प्रकार

विमानतळ पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार, 34 वर्षीय महिलेशी अनुराग शर्मा (वय 23) याने सोशल मीडियावर सोशल मीडियावर संवाद साधून विश्वास संपादन केला. त्यानंतर तिचा आयडी आणि पासवर्ड मिळवून तिची छायाचित्रे सेव्ह केली. महिलेला लग्नाची मागणी घालून तिने नकार दिल्यानंतर, अनुरागने तिचे आणि तिच्या पतीचे बनावट खाते तयार करून नातेवाईकांना मैत्रीच्या विनंत्या पाठवल्या.

हे ही वाचा >> पतीला नव्हती आवडत सावळ्या रंगाची पत्नी, पत्नीसोबत केलं 'असं' काही की...

तक्रार केल्यानंतर त्याने महिलेला भेटण्यास बोलावले आणि नशेची गोळी देऊन तिचे आक्षेपार्ह फोटो काढले. या फोटोंचा वापर करत तिच्या पती आणि मुलाला जीवे मारण्याची धमकी देत खंडणी मागितली. ही घटना फेब्रुवारी 2023 ते 5 जून 2025 या कालावधीत घडली. विमानतळ पोलिस तपास करत आहेत.

हडपसरमध्ये पाठलाग करून विनयभंग

दुसऱ्या घटनेत, हडपसर परिसरात 27 वर्षीय विवाहित महिलेचा पांडुरंग महादेव रामपुरे (वय 32, रा. मांजरी) याने सातत्याने पाठलाग करून विनयभंग केला. आरोपीने महिलेला वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरून फोन आणि मेसेज करून त्रास दिला. महिलने त्याचा क्रमांक ब्लॉक केल्यानंतरही त्याने तिचा पाठलाग सुरू ठेवला. रस्त्यात अडवून "माझा नंबर ब्लॉक का केला, मला बोलायला आवडतं," असे म्हणत तिचा विनयभंग केला. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिस तपास करत आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp