राजा-सोनम हनिमून प्रकरणात मोठी अपडेट! जंगलात सापडला मोठा पुरावा..पोलिसांना CCTV फुटेजमध्ये..

मुंबई तक

Raja And Sonam Honeymoon Case :  इंदौरहून शिलाँगमध्ये हनिमूनसाठी गेलेले कपल राजा रघुवंशी आणि त्याची पत्नी सोनम यांच्या केसमध्ये पोलिसांना मोठा पुरावा सापडला आहे.

ADVERTISEMENT

Raja And Sonam Honeymoon Murder Case
Raja And Sonam Honeymoon Murder Case
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पोलिसांना CCTV मध्ये काय सापडलं? 

point

सोनम फोन करताना दिसली अन्..

point

जंगलात सापडला मोठा पुरावा

Raja And Sonam Honeymoon Case :  इंदौरहून शिलाँगमध्ये हनिमूनसाठी गेलेले कपल राजा रघुवंशी आणि त्याची पत्नी सोनम यांच्या केसमध्ये पोलिसांना मोठा पुरावा सापडला आहे. दोघांचंही एक सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे. हे फुटेज 4 मिनिट 53 सेकंदाचं आहे. ज्या हॉटेलमध्ये ते थांबले होते, त्या हॉटेलचं हे सीसीटीव्ही फुटेज आहे. दोघेही त्याच स्कुटीवर बसून हॉटेलला येतात, जी स्कूटी घटनास्थळी सापडली होती.

CCTV मध्ये काय सापडलं? 

राजा आणि सोनम दोघेही स्कूटरवर बसून येतात. दोघांनीही हेल्मेट घातलं आहे. दोघेही लॉबी बॅग घेऊन त्याठिकाणी येतात. बाहेर स्कुटीवर बसल्यावर हॉटेल कर्मचाऱ्यासोबत चर्चा करतात. त्यानंतर स्कुटीच्या डिक्कीत सफेद रंगाची ट्रॉली बॅग ठेवण्याचा प्रयत्न करतात. ट्रॉफी बॅग डिक्कीत बसत नसल्याने त्यात असलेले कपडे डिक्कीत ठेवतात. सोनम तिचं रेनकोटही डिक्कीत ठेवते. दोघेही ट्रॉली घेऊन हॉटेलजवळ जातात.

हे ही वाचा >>Mumbai Weather: मुंबईत जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस, पुढील 3 तासांसाठी Red अलर्ट जारी

सोनम फोन करताना दिसली अन्..

सोनम लगेच बाहेर येते आणि स्कुटीपासून दूर जाऊन फोन करण्याचा प्रयत्न करते. तिच्या हातात दोन फोन असतात. ती फोन लावते पण संपर्क न झाल्याने टेन्शनमध्ये येते. त्यानंतर राजा हॉटेलमधून बाहेर येतो. तेव्हाही सोनम फोन करण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर दोघेही स्कुटीवर बसून त्या ठिकाणी जातात, जिथे त्यांनी प्रवास सुरु केला होता.

रेनकोटमध्ये काय सापडलं?

जंगलात डाग लागलेला जो रेनकोट सापडला होता, तसाच रेनकोट सोनमनेही घातला होता. जंगलात मिळालेला रेनकोट सोनमचाच आहे, अशी प्राथमिक माहिती आहे. परंतु, पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 23 मे पासून दोघांनाही संपर्क झाला नाही. कुटुंबियांना वाटलं की, नेटवर्कची समस्या आहे. जेव्हा दोघांचे फोन सतत बंद येत होते, तेव्हा कुटुंबियांचा संशय वाढला. त्यानंतर कुटुंबीय लगेच शिलाँगला पोहोचले आणि त्यानंतर सर्च ऑपरेशन सुरु झालं.

हे ही वाचा >> Honeymoon ला जाण्याआधी ज्योतिषीने दिलेला इशारा..तरीही सोनम आणि राजाने ऐकलं नाही अन् नको ते घडलंच!

हे वाचलं का?

    follow whatsapp