Mumbai Weather: मुंबईत जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस, पुढील 3 तासांसाठी Red अलर्ट जारी
Mumbai Weather Alert: मुंबईतील अनेक भागात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. तसंच पुढील तीन तासात अशाच स्वरूपाचा पाऊस येण्याची शक्यता असून हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मुंबईत जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरूवात

हवामान खात्याकडून अलर्ट जारी

मुंबईत मान्सून सक्रीय झाल्याने पावसाची जोरदार बॅटिंग
मुंबई: मुंबई आणि आसपासच्या परिसरात पावसाने आज (7 जून) सकाळपासूनच जोर धरला आहे. सध्या मुंबईत मुसळधार पाऊस बरसत आहे. दरम्यान, हवामान खात्याने पुढील तीन तासांत मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळेच पुढील तीन तासांसाठी हवामान विभागाकडून मुंबईसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, मुंबईशिवाय ठाणे, नवी मुंबईत देखील जोरदार पाऊस कोसळत आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून सक्रीय झाल्याने आता पाऊस बरसत आहे. हवामान खात्याचा अंदाज आहे की, पावसाचा हा प्रकार आठवड्याच्या शेवटीपर्यंत सुरू राहील. ज्यामध्ये हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
जळगाव, नाशिक, पुणे आणि नागपूरसह इतर जिल्ह्यांमध्येही असेच हवामान अंदाज आहे, जिथे काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. हवामान खात्याने सांगितले की, मुंबईत 11 जूनपर्यंत पावसाचा जोर कायम राहील.
40-50 किमी वेगाने वाहणार वारे
हवामान विभागाचे म्हणणे आहे की आज मुंबईत विजांसह मुसळधार पाऊस पडेल. यासोबतच 40-50 किमी वेगाने जोरदार वारेही वाहतील. मुंबईतून येणाऱ्या माहितीनुसार, अजूनही पाऊस बरसत आहे आणि जोरदार वारेही वाहत आहेत.