मोठ्या बिझनेसमनच्या सुनेला लागलेली अनैतिक संबंधांची चटक, तरुणाला बेडरूममध्ये बोलवायची अन्...

मुंबई तक

एका सुप्रसिद्ध व्यापारी कुटुंबातील सुनेने तिच्या प्रियकरासोबत अनैतिक संबंध ठेवण्यासाठी घरातील सासू-सासऱ्यांसह इतर सदस्यांना भरपूर प्रमाणात झोपेच्या गोळ्या दिल्याची बातमी समोर आली आहे.

ADVERTISEMENT

Pune Crime Giving sleeping pills to family members and having physical intercourse with her lover at home during the day
प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: ग्रोक
social share
google news

बातम्या हायलाइट

point

घरच्यांना झोपेच्या गोळ्या देऊन घरातच प्रियकरासोबत संबंध...

point

पुण्यातील व्यावसायिकाच्या सुनेचं धक्कादायक कृत्य!

Pune Crime: पुण्यातील एका प्रतिष्ठित व्यावसायिकाच्या घरातून विवाहबाह्य संबंधाचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. येथे, एका सुप्रसिद्ध व्यापारी कुटुंबातील सुनेने तिच्या प्रियकरासोबत अनैतिक संबंध ठेवण्यासाठी घरातील सासू-सासऱ्यांसह इतर सदस्यांना भरपूर प्रमाणात झोपेच्या गोळ्या दिल्याची बातमी समोर आली आहे. आरोपी महिला ही घरातील धाकटी सून असून कुटुंबातील सदस्य झोपल्यानंतर आपल्या प्रियकरासोबत दिवसाढवळ्या घरात अनैतिक संबंध ठेवत असल्याचं सांगितलं जात आहे. डिटेक्टिव्ह प्रिया काकडे यांच्या तपासामुळे हे प्रकरण समोर आलं. 

मेडिकल टेस्टमधून एक धक्कादायक बाब..

संबंधित कुटुंब हे पुण्यातील प्रसिद्ध व्यापारी असल्याची माहिती आहे. वृद्ध दाम्पत्य, त्यांची दोन मुलं आणि दोन सुना असं हे कुटुंब आहे. काही महिन्यांपासून वृद्ध दाम्पत्याला वारंवार झोपेचा त्रास जाणवत होता. सुरुवातीला वयामुळे त्रास होत असावा, असं समजून त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला. मात्र डॉक्टरांच्या मेडिकल टेस्टमधून एक धक्कादायक बाब समोर आली.

हे ही वाचा: "पती अनोळखी पुरुषांसोबत संबंध ठेवायला सांगायचा..." 4 मुलांना सोडून प्रियकरासोबत पळून गेली अन् कोर्टात भलतंच सांगितलं...

झोपेच्या गोळ्यांचं अधिक प्रमाण

त्या वृद्ध दाम्पत्याच्या शरीरात झोपेच्या गोळ्यांचं भरपूर प्रमाण आढळून आलं. त्यानंतर, घरातील इतर सदस्यांची सुद्धा वैद्यकीय तपासणी करण्यात आली. घरातील मोठ्या सुनेच्या शरीरातही झोपेच्या गोळ्यांचं अधिक प्रमाण दिसून आलं. मात्र, कुटुंबातील धाकट्या सुनेची तपासणी केली असता तिच्या शरीरात काहीच आढळलं नाही. यामुळे, डॉक्टरांना आणि इतर कुटुंबियांना घरातील धाकट्या सुनेवर संशय आला. या घटनेच्या काही दिवसांनंतर घरातील काही दागिने आणि पैसे गायब झाल्याचं कुटुंबियांच्या लक्षात आलं. यानंतर, कुटुंबियांनी सुप्रसिद्ध डिटेक्टिव्ह प्रिया काकडे यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली. 

हे ही वाचा: स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांची घोषणा, मतदान आणि मतमोजणी कधी? संपूर्ण माहिती एका क्लिकवर

डिटेक्टिव्हच्या तपासातून सगळं उघडकीस 

डिटेक्टिव्ह प्रिया काकडे यांनी आरोपी सुनेसोबत मैत्री करून प्रकरणाशी संबंधित पुरावे गोळा केले. त्यानंतर, सुनेचं धक्कादायक कृत्य उघडकीस आलं. खरं तर, धाकटी सून घरातील सासू-सासऱ्यांसह इतर सदस्यांच्या नाष्त्यामध्ये झोपेच्या गोळ्या मिसळायची आणि नंतर, प्रियकाराला घरात बोलवून दिवसाढवळ्या त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवायची. दरम्यान, प्रकरण समोर आल्यानंतर आरोपी सुनेनं तिचा गुन्हा कबूल केला. त्यानंतर, कुटुंबियांनी धाकट्या सुनेविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आणि चोरी झालेले दागिने, पैसे कुटुंबियांना परत मिळाले. 

हे वाचलं का?

    follow whatsapp