स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांची घोषणा, मतदान आणि मतमोजणी कधी? संपूर्ण माहिती एका क्लिकवर
State Election Commission press conference : निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांची घोषणा, मतदान आणि मतमोजणीच्या तारखा समोर
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांची घोषणा
मतदान आणि मतमोजणीच्या तारखा समोर
State Election Commission press conference : राज्य निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल 3 डिसेंबरला लागणार आहेत. मा. राज्य निवडणूक आयुक्त श्री. दिनेश वाघमारे यांनी आज (दि.4) पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा केली आहे.
आजपासून म्हणजेच 4 नोव्हेंबरपासून राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. राज्यातील 29 महापालिका, 32 जिल्हा परिषदा, 42 नगरपंचायती, 336 पंचायत समित्या आणि 246 नगरपालिकांचा कार्यकाळ संपला असून, या सर्व ठिकाणी नव्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडतील.
महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे :
नामनिर्देशन दाखल करण्याची तारीख – 10 नोव्हेंबर










