पुण्याची गोष्ट : पुणेकरांना हक्काचं घर विकत घेणं होणार सोपं, 90 लाखांचं घर मिळणार 28 लाखात, असा करा अर्ज

मुंबई तक

Pune News : पुणे सारख्या स्मार्ट सिटीत आपल्या हक्काचं घर असावं असे अनेकांचं स्वप्न असतं. पण, याच वाढत्या महानगरातील घरांच्या वाढत्या किंमतीने सामान्यांना घर विकत घेणं शक्य नसते, पण आता एका योजनेच्या माध्यमातून 80 लाखांचं घर केवळ 28 लाखांत विकत घेता येणार असल्याची महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

ADVERTISEMENT

Pune News
Pune News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुण्यात 'या' ठिकाणी कमी किंमतीत घेता येणार घर

point

Mhada Home : अर्ज कधी आणि  कसा करायचा?

पुण्याची गोष्ट : पुणे सारख्या स्मार्ट सिटीत आपल्या हक्काचं घर असावं असे अनेकांचं स्वप्न असतं. पण, याच वाढत्या महानगरातील घरांच्या वाढत्या किंमतीने सामान्यांना घर विकत घेणं शक्य नसते. अशातच आता पुण्यात घर घेऊ इच्छिणाऱ्यांना आनंदाची बातमी समोर आली आहे. मध्यमवर्गीयांना एक विशेष गृहयोजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेच्या अंतर्गत म्हाडाच्या लॉटलीद्वारे पुण्यातील प्रमुख ठिकाणी अतिशय खिशाला परवडणाऱ्या दरातच घर खरेदी करता येणार असल्याची संधी आहे. 

हे ही वाचा : Astrology : 'या' राशीतील लोकांच्या आयुष्यात पडणार पैशांचा पाऊस, यशही हात धुवून लागेल मागे, महत्त्वाचं राशीभविष्य

पुण्यात 'या' ठिकाणी कमी किंमतीत घेता येणार घर

पुण्यातील वेगाने होणाऱ्या विकासित भागातील वाकड आणि हिंजवडी परिसरात यश्विन अर्बो सेंट्रो  या खासगी गृहनिर्माण प्रकल्पात ही घरे आहेत. तसेच भूमकर चौक, इंदिरा गांधी कॉलेज आणि मुख्य महामार्गाला लागून असलेल्या ठिकाणी घर विकत घेता येणार आहे. दरम्यान, घराचा प्रकार हा साधारणात 2 BHK आणि 3 BHK 500 ते 600 स्क्वेअर फूट आहे. 

या एकूण घरांच्या किंमतीबाबत विचार केल्यास आपल्याला अधिक आनंद होईल. घराची अंदाजी किंमत ही 80 ते 90 लाख असणार आहे. पण म्हाडा लॉटरीतील किंमत ही 28.42 लाख ते 28.74 लाख रुपये आहे. यामुळे अर्जदाराची 60 लाखांची बचत होणार आहे. अशा ठिकाणी कमी किंमतीत घर मिळवण्याची संधी पुन्हा कधीही मिळणार नाही. 

हे ही वाचा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आजच घोषणा होणार? राज्य निवडणूक आयोगाची दुपारी पत्रकार परिषद

Mhada Home : अर्ज कधी आणि  कसा करायचा?

म्हाडाच्या https://lottery.mhada.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. 

हे वाचलं का?

    follow whatsapp