वसई : फेसबुकवर ओळख, भेटायला बोलावून गुंगीकारक पदार्थ दिला; महादेवाचा अवतार असल्याचं सांगून महिलेवर बलात्कार
Vasai Crime News : एका स्वयंघोषित धर्मगुरुने गुुंगीकारक पदार्थ देऊन आणि महादेवाचा अवतार असल्याचं सांगून एका महिलेवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
वसई : फेसबुकवर ओळख, भेटायला बोलावून गुंगीकारक पदार्थ दिला
महादेवाचा अवतार असल्याचं सांगून महिलेवर बलात्कार
Vasai Crime News : ‘मी शंकर आहे असून तू माझी पार्वती आहे', असे सांगून एका महिलेवर बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी वसईतील स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेष वैद्य याच्याविरोधात वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील कारवाईसाठी हे प्रकरण पुण्यातील हडपसर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.
हेही वाचा : मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी, जीवनाचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या प्रवाशांचा विकेंडला हिरमोड
फेसबुकवर ओळख आणि भेटायला बोलवून अत्याचार
पीडित महिला 35 वर्षांची असून पुण्यात राहते. तिने माणिकपूर पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, 2023 मध्ये तिची ओळख वसईतील स्वयंघोषित धर्मगुरू आणि आमची वसई या संस्थेचा प्रमुख ऋषिकेश वैद्य याच्याशी फेसबुकवर झाली. त्याने पीडित महिलेच्या धार्मिक वृत्तीचा फायदा घेत अध्यात्म शिकविण्याच्या बहाण्याने जवळीक साधली. डिसेंबर 2023 मध्ये तो तिला भेटायला पुण्यात गेला. मी महादेवाचा अवतार आहे. तू माझी पार्वती आहेस असे सांगून तिला भुलवले. त्यानंतर तिला पुण्यातील मांजरी येथील एका लॉजमध्ये नेले आणि तिला गुंगीकारक पदार्थ देऊन तिच्यावर अत्याचार केला. या काळात वैद्य याने तिच्या नकळत तिचे अश्लील छायाचित्रे काढली होती.
हेही वाचा : Maharashtra Weather : राज्यात अवकाळीचं दुहेरी संकट, 'या' जिल्ह्यांत पाऊस कोसळण्याची शक्यता, महत्त्वाचा अलर्ट









