India Today Gold Rate: बाईईई...दिवाळीआधीच सोनं गडगडलं! मुंबईसह 'या' 15 शहरांमध्ये 1 तोळ्याचा दर काय?

मुंबई तक

Gold Rate Today In India:  करवाचौथ आधी सलग तिसऱ्या दिवशी सोनच्या भावात वाढ झाली आहे. सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा भाव 78990 रुपयांवर पोहोचला आहे. आज शनिवारी 19 ऑक्टोबरला राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा भाव 79,140 रुपयांवर पोहोचला आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

बातम्या हायलाइट

point

सोन्याच्या दरात नेमकी किती रुपयांनी वाढ झाली?

point

मुंबईत सोन्याच्या एक तोळ्याचा भाव काय?

point

चांदीच्या किंमतीतही झाली वाढ, एक किलोचा रेट काय?

Gold Price Today In India:  करवाचौथ आधी सलग तिसऱ्या दिवशी सोनच्या भावात वाढ झाली आहे. सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा भाव 78990 रुपयांवर पोहोचला आहे. आज शनिवारी 19 ऑक्टोबरला राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा भाव 79,140 रुपयांवर पोहोचला आहे. तसच चांदीचा भावातही वाढ झाली आहे. चांदी प्रति किलोग्रॅम 99,100 रुपयांवर पोहचली आहे. देशातील 15 मोठ्या शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमतीत किती रुपयांनी वाढ झाली आहे? जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

दिल्ली, नोएडा आणि गुरुग्राममध्ये सोन्याचा भाव

दिल्लीत 22 कॅरेट सोन्याची प्रति 10 ग्रॅमची किंमत 72560 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याची प्रति 10 ग्रॅमची किंमत जवळपास 79140 रुपये आहे.

मुंबई आणि कोलकातात सोन्याचा भाव

मुंबईत 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 72410 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 78990 रुपये आहे.

चेन्नई आणि बंगळुरुत सोन्याची किंमत

चेन्नई आणि बंगळुरुत 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 72410 रुपये झाली आहे. तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा भाव 78990 रुपयांवर पोहोचला आहे.