29th November Gold Rate : अहो राव! काय 'ते' सोन्याचे भाव; आजच्या 1 तोळा दराने सर्वांनाच फोडलाय घाम

मुंबई तक

Today Gold Rate: सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. आज संपूर्ण देशात सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 7600 रुपयांची वाढ झाली आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आजचं सोनं-चांदीचं भाव वाचून थक्कच व्हाल

point

मुंबईत आज 1 तोळा सोन्याचा भाव काय?

point

चांदीच्या भावातही झालीय वाढ

Today Gold Rate: सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. आज संपूर्ण देशात सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 7600 रुपयांची वाढ झाली आहे. तर 22 कॅरेट सोनं 7100 रुपयांनी महागलं आहे. सोनं-चांदीच्या आजच्या 29 नोव्हेंबरच्या दराबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती. आज 29 नोव्हेंबरला 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा भाव 760 रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे सोन्याची आजची किंमत 78260 रुपये झाली आहे. तर 24 कॅरेटच्या सोन्याच्या प्रति 100 ग्रॅमच्या भावात 7600 रुपयांनी वाढ होऊन आजची किंमत 7,82,600 रुपयांवर पोहोचली आहे. 

आज 22 कॅरेट सोनं 'इतक्या' रुपयांनी महागलं

आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमच्या भावात 710 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आजची किंमत 71760 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 100 ग्रॅम भावात 7100 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे याची किंमत 7,17,600 रुपयांवर पोहोचली आहे. तसच आज सोन्याच्या 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 100 ग्रॅमच्या दरात 5800 रुपयांनी वाढ झालीय . तर 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमच्या भावात 580 रुपयांनी वाढ झाली असून याची किंमत 58710 रुपये झाली आहे. 

हे ही वाचा >>  Raj Kundra Case : शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा पुन्हा अडचणीत, सकाळपासून ईडीची छापेमारी, प्रकरणाचे अपडेट्स

आजचा चांदीचा भाव काय?

आज 29 नोव्हेंबरला चांदीच्या भावात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. याआधी देशभरात चांदीच्या भावात फारसे बदल झाले नव्हते. आज 10 ग्रॅम चांदी 20 रुपयांनी महागलं असून 915 रुपयांवर पोहोचली आहे. तर 100 ग्रॅम चांदी 200 रुपयांनी महागली असून 9150 रुपयांवर पोहोचली आहे. याशिवाय 1 किलोग्रॅम चांदीचे भाव 29 नोव्हेंबरला 2000 रुपयांनी वाढले असून हे दर 91500 रुपयांवर पोहोचले आहेत.

हे ही वाचा >> Mumbai Bhandup School Case : मुंबईतील भांडुपमध्ये नामांकित शाळेत 3 विद्यार्थीनींसोबत गैरवर्तन, बदलापूरची पुनरावृत्ती?

मुंबई

मुंबईत आज 29 नोव्हेंबरला सोन्याचा प्रति 1 ग्रॅमचा भाव 7160 रुपये झाला आहे.

दिल्ली 

आज दिल्लीत 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 1 ग्रॅमचा भाव 7176 रुपये झाला आहे.

बंगळुरु

बंगळुरुत आज 29 नोव्हेंबरला 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 1 ग्रॅमचा भाव 7160 रुपये झाला आहे.

जयपूर

आज जयपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 1 ग्रॅमचा भाव 7176 रुपये आहे.

पटना

पटनामध्ये आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 1 ग्रॅमचा भाव 7165 रुपये झाला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp