Plane Crash : 12 तारीख..11-A सीट नंबर अन् गुरुवारचा दिवस! विश्वास कुमारसाठी लकी दिवस, ज्योतिषी म्हणाला..
Air India Plane Crash Latest Update : गुजरातच्या अहमदाबाद विमानतळाहून लंडनसाठी उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांतच एअर इंडियाचं विमान कोसळलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

एअर इंडिया विमान अपघातात मोठी अपडेट समोर

एकमेव प्रवासी रमेश विश्वास कुमार कसा वाचला?

ज्योतिष शास्त्रानुसार समोर आली आश्चर्यकारक माहिती
Air India Plane Crash Latest Update : गुजरातच्या अहमदाबाद विमानतळाहून लंडनसाठी उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांतच एअर इंडियाचं विमान कोसळलं. टेक ऑफ केलेलं विमान अचानक खालच्या दिशेनं झेपावलं आणि मेघानीनगरच्या मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलच्या इमारतीवर आदळलं.त्यानंतर विमानाला मोठी आग लागली अन् धुराचे प्रचंड मोठे लोड आकाशात पसरले.
एकमेव प्रवासी रमेश विश्वास कुमार कसा वाचला?
या विमानातून एकूण 242 प्रवासी प्रवास करत होते. दरम्यान, या अपघातात 265 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. पण एका प्रवाशाचं दैव बलवत्तर होतं अन् त्याचा जीव वाचला. या दुर्देवी अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी रमेश विश्वास कुमार ब्रिटनचा नागरिक आहे. रमेशचा सीट नंबर 11 ए होता.
ज्योतिष शास्त्रानुसार, नाव आणि सीट नंबरचा योग आहे. नाव आणि सीट नंबरच्या संयोगामुळे रमेश विश्वास कुमारचा जीव वाचला. नावाची अल्फाबेटिकल मोजणी केली, तर रमेशचा अंक येतो 214535..याची बेरीज 20 येते. अशाचप्रकारे विश्वासचा नंबर 6135613 आणि कुमारचा 15.. विश्वासच्या नंबरची बेरिज 25 आणि कुमारचा योग 15 होतो. या तिन्हीची बेरिज केल्यावर 60 क्रमांक येतो. अपघाताचा दिवस होता 12.6.2025..सीट नंबर होता 11 A म्हणजेच 12.
हे ही वाचा >> 1206 लकी नंबर ठरला अनलकी, 12-06 ही तारीख माजी मुख्यमंत्र्यांचा ठरला अखेरचा दिवस
नाव आणि सीट नंबरचा योग येतो. रमेश विश्वास कुमारचं अल्फाबेटीकल अंक 60 आहे. हा नंबर 6 चा प्रतिनिधित्व करतो. 12.6.2025 चा योग 9 वर पोहोचतो. 9 मंगळचा अंक आहे. जो अग्निचा कारक आहे. या अपघातात विमानाला भीषण आग लागली. रमेश विश्वास कुमारचा नामांक 6 येतो. हा शुक्राचा अंक आहे.
हा अंक जल प्रधान असल्याने भयंकर अपघात, भीषण आग लागल्यावरही रमेशची जीव वाचला. यामध्ये 12 तारीख आणि गुरुवारच्या दिवसाचा सकारात्मक संयोगही त्यांना मिळाला. गुरुवार 12 जून 2025 चा मुलांक 3,6 आणि 9 चा सर्वोच्च प्रभाव असतो. या तिन्ही मध्ये जल तत्वाचा प्रभाव असणारा अंक शुक्र अंक 6 आहे.