भारतीय कोस्ट गार्डमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल 630 पदांसाठी भरती

मुंबई तक

इंडियन कोस्ट गार्ड (ICG) कडून 2025 वर्षातील, सेलर (जनरल ड्यूटी, डोमेस्टिक ब्रांच) आणि मेकॅनिकल पदांसाठी एकूण 630 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

भारतीय कोस्ट गार्डमध्ये नोकरीची सुवर्णसंधी
भारतीय कोस्ट गार्डमध्ये नोकरीची सुवर्णसंधी
social share
google news

बातम्या हायलाइट

point

इंडियन कोस्ट गार्डमध्ये नोकरीची सुवर्णसंधी

point

ICG कडून 630 पदांसाठी भरती

point

ICG च्या भरतीसाठी काय आहे पात्रता?

Govt Job: देशातील अनेक तरुणांचं भारतीय दलात नोकरी करुन देशाची सेवा करण्याचं स्वप्न असतं. भारतीय तटरक्षक दलात आपलं योगदान देऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी नव्या भरतीची बातमी समोर आली आहे. इंडियन कोस्ट गार्ड (ICG) कडून 2025 वर्षातील, सेलर (जनरल ड्यूटी, डोमेस्टिक ब्रांच) आणि मेकॅनिकल पदांसाठी एकूण 630 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. 

या भरतीसाठी 11 जून 2025 पासून ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी इच्छुक उमेदवार 25 जून 2025 पर्यंत joinindiancoastguard.cdac.in या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करू शकतात. 

कोणत्या पदांसाठी भरती? 

CGEPT-01/2026: यामध्ये सेलर (GD) साठी 260, मेकॅनिकल साठी 30, इलेक्ट्रिकल साठी 11 आणि इलेक्ट्रॉनिक्स साठी 19 पदे आहेत.

CGEPT-02/2026: यामध्ये, सेलर (GD) च्या 260 पदे आणि डोमेस्टिक ब्रँचच्या 50 पदांचा समावेश आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp