Plane Crash: संपूर्ण विमान जळून राख झालं तरी तो कसा वाचला? बचावलेल्या रमेशचा प्रत्येक शब्द तुमच्या अंगावर आणेल काटा!

मुंबई तक

Ahmedabad Air India Crash :  गुजरातच्या अहमदाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एअर इंडियाचे  AI-171 विमानाचा अपघात झाला असून या अपघातात अनेकजण मृत पावले. आश्चर्याची बाब म्हणजे या अपघातात एक व्यक्ती बचावला असून त्याने घडलेला घटनाक्रम सांगितला आहे.

ADVERTISEMENT

ahmedabad air India crash in survivor recounts tragic incident
ahmedabad air India crash in survivor recounts tragic incident
social share
google news

बातम्या हायलाइट

point

गुजरातच्या अहमदाबादमध्ये विमान दुर्घटनेची सर्व माहिती

point

विमान अपघातात वाचलेल्या तरुणाने सांगितला घटनाक्रम

Ahmedabad Air India Crash : गुजरातच्या अहमदाबादमध्ये (Gujarat plane crash) एक धक्कादायक घटना घडली आहे. 12 जून रोजी गुरूवारी दुपारी 1 वाजून 39 मिनिटांनी एअर इंडियाच्या AI-171 विमानाचा अपघात झाला. या अपघातात अनेकजण मृत पावले आहेत. यामुळे देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या अपघातात एक व्यक्ती बचावला आहे. त्याने घडलेला घटनाक्रम सांगितला आहे. त्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे. या विमान अपघातात बचावला गेलेल्या तरुणाचे नाव रमेश विश्वासकुमार असे आहे.

हेही वाचा : Ahmedabad Air India Crash: टेक ऑफ ते क्रॅश... अवघ्या 59 सेकंदात काय घडलं?, विमान अपघाताचं Exclusive CCTV

नेमकं काय घडलं? 

गुजरातच्या अहमदाबादहून लंडनच्या गॅटविकला जाणारे एअर इंडियाचे AI-171 विमान महाविद्यालयाच्या कँटिनला धडकले. यात महाविद्यालयाच्या कॅन्टीनचं नुकसान झालं आहे. त्यानंतर विमान अतुल्यम हॉटेलला अदळल्याने विमानाला आगडोंब उसळल्याने सर्वत्र धूर पसरला आणि या विमान अपघातात 230 जण आणि 12 क्रू मेंबर असे एकूण 242 प्रवासी प्रवास करत होते. या अपघातात एक प्रवासी वाचल्याने त्यानं या घडलेल्या घटनेची माहिती दिली.

नेमकं काय म्हणाले रमेश विश्वासकुमार? 

विमान अपघातात विमान प्रवासी रमेश विश्वासकुमार यांना नशिबाची साथ मिळाली. उपचार घेत असताना त्यांनी आजतक वृत्तमाध्यमाशी संवाद साधला. ते म्हणाले की, स्फोट झालेल्या विमानाला मोठी आग लागली. मला रुग्णवाहिकेतून एका रुग्णालयात पाठवले. मी वाचल्याचा मला विश्वास बसत नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

या अपघातानंतर मृत व्यक्तींच्या नातेवाईकांची डीएनए चाचणी करण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे ओळख त्यांची ओळख पटण्यास मदत होईल. 8 हजार 200 तास विमानाच्या उड्डाणाचा अनुभव असणारे वैमानिक सुमित सभरवला होते.

हेही वाचा : वैमानिकाला अंदाज आला आणि MAYDAY मेसेज नियंत्रण कक्षाला दिला, घटनेचं कारण कळलं?

विमानसेवा ठप्प 

अहमदाबादहून दिल्लीला उड्डाण करणारी विमाने रद्द करण्यात आली आहेत. या अपघाताने देशाला धक्का बसला आहे. सोशल मीडियावर लोक शोक व्यक्त करत असून अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp