Mumbai मधील हवेची गुणवत्ता ढासळली, दिवाळीनंतर सर्वाधिक प्रदूषण!

विद्या

ADVERTISEMENT

Air quality in Mumbai deteriorates most pollution after Diwali
Air quality in Mumbai deteriorates most pollution after Diwali
social share
google news

Mumbai Air Pollution : मुंबईच्या वातावरणात सध्या गारवा जाणवत आहे. अशा परिस्थितीत मुंबईतील हवेचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढलं होतं. पण दोन दिवसांपूर्वी पाऊस पडल्याने मुंबईचं प्रदूषण काहीसं कमी झालं होतं. मात्र आता दिवाळीमुळे पुन्हा प्रदूषण वाढलं आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता बिघडली असून यंदा दिल्लीपेक्षा मुंबईतील हवेची वाईट स्थिती आहे. मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) दिवाळीनंतर खूपच खराब आहे. (Air quality in Mumbai deteriorates most pollution after Diwali)

मुंबईतील हवेची गुणवत्ता आधीच घसरलेली असताना फटाके फोडण्यासाठी उच्च न्यायालयाने दिलेल्या नियमावलीचे उल्लंघन केलं जात आहे. फटाक्यांच्या धुरामुळे मुंबईत आणखी मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढताना पाहायला मिळतंय.

वाचा : NCP: शरद पवारांनी अजितदादांना पुन्हा एकदा घेतलं सावरून, नेमका किस्सा काय?

मुंबईची हवेची गुणवत्ता अधिक खालावली आहे. खराब हवा गुणवत्ता निर्देशांकामुळे, 10 नोव्हेंबर रोजी, मुंबई उच्च न्यायालयाने फटाके रात्री 8 ते 10 दरम्यानच फोडावेत असे निर्देश दिले होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

यावेळी मुंबई पोलिसांनी इशाराही दिला. पण नंतर लोकांनी ऐकले नाही त्यावेळी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. असे तब्बल 784 गुन्हे नोंदवण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाद्वारे 10 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर दरम्यान रात्री 10 नंतरही पर्यंत फटाके फोडल्याप्रकरणी 806 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

वाचा : Rohit Pawar : “फडणवीस नेत्यांना पुढे करून वाद…”, पवारांच्या विधानाने खळबळ

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आवाहन करून देखील मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आले. त्यामुळे प्रदूषणामध्ये आणखी वाढ झाल्याचे चित्र सध्या मुंबईमध्ये दिसून येत आहे. यादरम्यान, महाराष्ट्र सरकारही खडबडून जागे झाले आहे. त्यांनी धूळ कमी करण्याचे नियम न पाळणाऱ्या पायाभूत सुविधा प्रकल्प कंत्राटदार आणि बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT