Viral Video: विमानात केली 'ती' गोष्ट, एअर होस्टेसचा तर कार्यक्रमच झाला...

मुंबई तक

Viral News: प्रवाशांनी विमानात चढण्यापूर्वी एका एअर होस्टेसने असे काही केले ज्यामुळे तिची नोकरी गेली. तेव्हापासून हे संपूर्ण प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ADVERTISEMENT

विमानात केली 'ती' गोष्ट, एअर होस्टेसचा तर कार्यक्रमच झाला... (फोटो - Meta AI)
विमानात केली 'ती' गोष्ट, एअर होस्टेसचा तर कार्यक्रमच झाला... (फोटो - Meta AI)
social share
google news

बातम्या हायलाइट

point

एअर होस्टेस्ट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

point

फ्लाइटमध्ये डान्स केल्याने तरुण एअर होस्टेसवर झाली कारवाई

point

TikTok वर व्हिडिओ शेअर करणं पडलं महागात

Viral News Air hostess: प्रवाशांच्या आगमनापूर्वी एक एअर होस्टेस विमानात काहीतरी करत होती, ज्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि तिला नोकरी गमवावी लागली. खरंतर, कामाच्या दरम्यान नाचणे फ्लाइट अटेंडेंटला महागात पडलं आहे.

प्रवाशांनी विमानात चढण्यापूर्वी एअर होस्टेसने एका खास प्रकारचा डान्स केला आणि त्याचा व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला. यानंतर, विमान कंपनीने कामाच्या दरम्यान असे कृत्य केल्याबद्दल तिच्यावर कारवाई केली आणि तिला नोकरीवरून काढून टाकले. या घटनेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली.

हे ही वाचा>> काय हा प्रकार... अंतर्वस्त्रावर तरुणी-तरुणांचा मेट्रोमधून प्रवास

काय प्रकरण आहे?

अलास्का एअरलाइन्सच्या फ्लाइट अटेंडंट नेल डायला ही नुकतीच नव्या नोकरीला लागली होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वी विमानात कॅप्टन येण्याआधी तिने विमानात डान्स केला आणि त्याचा व्हिडीओ टिकटॉकवर शेअर केला. व्हिडिओमध्ये नेल नाचताना दिसली, ज्याचे कॅप्शन तिने दिले - 'गॅटो गर्ल्स फॉरएव्हर, यूनिफॉर्म आहे म्हणून फसू नका.'

डायलाने तिच्या कामाचा प्रोबेशन कालावधी संपल्याचा आनंद साजरा करण्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता, परंतु तिचा हा आनंद फार काळ टिकला नाही. कंपनीने डायलाला केवळ सहा महिन्यांच्या सेवेनंतर बेशिस्तपणाचे कारण देत नोकरीवरून काढून टाकले.

सोशल मीडियावर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, डायलाने तो पुन्हा पोस्ट केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले - 'कामाच्या आधी थोडी मजा करण्यात काय गैर आहे? लोक हे करतात, हे काही नवीन नाही.' डायलाच्या या युक्तिवादाशी अनेक लोक सहमत नव्हते आणि त्यांनी तिच्यावर टीका केली.

हे ही वाचा>> Reels Addiction : झोपण्यापूर्वी तासंतास रील्स पाहत असाल, तर आजारी पडाल... वाचा काय काय होतात परिणाम

एका इंस्टाग्राम यूजरने लिहिले. 'जर तुम्ही गणवेशाचा आदर केला नाही तर तुम्ही नोकरीचाही आदर करणार नाही. अटी आणि शर्ती सर्वांना लागू.' दुसऱ्याने लिहिले, 'तुम्हाला चुकीच्या पद्धतीने काढून टाकण्यात आले आहे असा दावा करू नका. नवीन नोकरी शोधा आणि कामाला महत्त्व द्या.' तर आणखी एका यूजरने लिहिले की, 'काम करताना गणवेश घालून असे केल्याने कंपनी आणि ब्रँडची प्रतिमा खराब होते.'

GoFundMe मोहीम सुरू केली

ज्या पद्धतीने नेलला कामावरून काढून टाकलं त्यामुळे ती खूपच नाराज झाली आहे. ही गोष्ट चुकीची असल्याचंही तिने म्हटलं आहे. दरम्यान, तिने आर्थिक मदतीसाठी GoFundMe पेज सुरू केले आहे. 

तिने लिहिले की, 'मी कधीही विचार केला नव्हता की एका क्षणात माझे आयुष्य बदलेल. ही नोकरी माझी 'स्वप्नातील नोकरी' होती, ज्यामुळे मला जगभर प्रवास करण्याची आणि नवीन लोकांना भेटण्याची संधी मिळाली. दरम्यान, आता या मोहिमेअंतर्गत, तिने $ 12000 चे ध्येय ठेवले आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp