काय हा प्रकार... अंतर्वस्त्रावर तरुणी-तरुणांचा मेट्रोमधून प्रवास
लंडनमधील तापमान उणे ३ अंशांपर्यंत होते.. अशातही मेट्रोमध्ये अनेक तरुणी आणि तरुणांनी चक्क विना पँट प्रवास केला. जाणून घ्या हे संपूर्ण प्रकरण आहे तरी काय.
ADVERTISEMENT

No Trousers Day: लंडन: कंबरेच्यावर पूर्ण कपडे, पायात बूट आणि मोजे, पण फक्त कंबरेखाली अंतर्वस्त्रे. लंडन मेट्रोच्या या दृश्याने अनेकांना आश्चर्यचकित केलं. लंडनमधील तापमान हे शून्यापेक्षा कमी असताना देखील अनेक तरुणी आणि तरूण हे रविवारी विना पँट मेट्रोतून प्रवास करताना दिसून आले. (in minus 3 degree temperature young men and women traveled in london metro without trousers)
नेमका काय आहे हा प्रकार?
खरं तर, सण-उत्सवप्रेमी लंडनवासी रविवारी लंडन ट्यूब नो ट्राउजर डे साजरा करत होते. (London tube no trousers day) म्हणजेच, ज्या दिवशी त्यांना लंडन मेट्रोमध्ये पँट, पायजमा घालायचे नाही असा दिवस. लंडनमधील मेट्रोला ट्यूब असं म्हणतात.
या मोहिमेत मुली आणि महिला देखील दिसून आल्या. आणि त्या देखील फक्त कमरेखाली अंतर्वस्त्रे परिधान करून हिंडत होत्या.
रविवारी, लंडनमधील वेस्टमिन्स्टर, वॉटरलू, साउथ केन्सिंग्टन, चायनाटाउन सारख्या मेट्रो स्टेशनवर शेकडो पुरुष आणि महिला दिसले ज्यांनी ट्राउझर्स किंवा पायजमा घातलेला नव्हता.










