NCP : अजित पवार-जितेंद्र आव्हाडांतील संघर्ष टोकाला! ‘नाटकीबाज’वर म्हणाले ‘कावळा’
शरद पवार समर्थक जितेंद्र आव्हाड आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील राजकीय संघर्ष विकोपाला जाताना दिसत आहे. नाटकीबाज असे अजित पवारांनी म्हणताच जितेंद्र आव्हाडांनी उत्तर दिलंय…
ADVERTISEMENT

Ajit Pawar Jitendra Awhad News : शरद पवारांच्या नेतृत्वाला आव्हान देऊन अजित पवार वेगळं झाले. त्यानंतर ते सातत्याने शरद पवारांना लक्ष्य करताना दिसत आहेत. पण, यात अजित पवार विरुद्ध जितेंद्र आव्हाड यांच्यातील सुप्त संघर्ष आता शिगेला पोहोचल्याचे दिसत आहे. त्यात अजित पवारांच्या बारामतीतील विधानाने भर टाकलीये.
“कुणी भावनिक होतील. आमची शेवटची निवडणूक आहे म्हणतील… अमकंच आहे, तमकंच आहे म्हणतील… त्यांची शेवटची निवडणूक कधी होणार आहे माहीत नाही. तुम्ही भावनिक होऊ नका अशी माझी विनंती आहे”, अशी टीका अजित पवारांनी शरद पवारांवर केली.
जितेंद्र आव्हाड-अजित पवार राजकीय वाद
अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात फारसं सख्ख्य नसल्याचे राष्ट्रवादीच्या फुटीपूर्वीही दिसून आलेलं आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर दोन्ही नेते एकमेकांना टार्गेट करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. बंड केल्यापासून आव्हाड अजित पवारांवर वेगवेगळ्या मुद्द्यांवरून टीका करत आहेत.
हेही वाचा >> सरन्यायाधीशांच्या संतापाचा कडेलोट, भाजपला मोठा झटका, सुप्रीम कोर्टाने काय दिले आदेश
त्यातच शरद पवारांबद्दल अजित पवारांनी हे विधान केल्याने जितेंद्र आव्हाडांनी पुन्हा एकदा लक्ष्य केले.