Ajit Pawar : अजित पवार बारामतीत झाले भावूक; म्हणाले, "मला एकटं पाडण्याचा..."

मुंबई तक

ADVERTISEMENT

अजित पवार भाषण करताना भावूक झाले.
Ajit Pawar Speech in Baramati
social share
google news

Ajit Pawar speech in Marathi : (वसंत पवार, बारामती) शरद पवार हेच आपले विरोधक असल्याचे अप्रत्यक्षपणे अधोरेखित करत अजित पवारांनी कार्यकर्त्यांना बारामतीतून खासदार निवडून देण्याचं आवाहन केलं. बारामतीत भाषण करताना अजित पवार भावूक झाल्याचंही बघायला मिळालं. ()

बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले, "माझं तुम्हाला सांगणं आहे की, तुमच्या मनात कोणताही संभ्रम राहता कामा नये. त्यामध्ये अजून पण काहींना 'नाही... नाही. हे एकच होतील राव. हे आपल्यालाच बनवताहेत की काय?' असं काही नाही. आता क्लिअर क्लिअर आम्ही सांगून पण ऐकलं जात नाही", असे सांगत आता पुन्हा शरद पवारांसोबत जाणार नाही, असेच अजित पवारांनी स्पष्ट केलं.  

"सगळे माझ्याविरोधात...", अजित पवार झाले भावूक

भाषणात अजित पवार म्हणाले, "बारामतीकरांनो, आता दुसरं एक सांगतो. आमच्या घरातील वरिष्ठ ते एकमेव आहेत. दुसरे आहेत, परंतु ते पुण्यात असतात. त्यामुळे मी आणि माझा परिवार सोडला, तर कदाचित बाकीचे सगळे माझ्या विरोधात प्रचार करतील", असं अजित पवार म्हणाले. (खालून उपस्थित म्हणाले, आम्ही आहोत दादा) त्यानंतर ते भावूक झाल्याचं बघायला मिळालं. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पुढे ते म्हणाले, "मला एवढंच सांगायचं आहे की, बाकीचे सगळे घरातील माझ्याविरोधात गेले, तर तुम्ही सगळे माझे भाऊबंद आहेत. त्यामुळे आपण कुणाला विनंती करायची असेल, तर करू. प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. प्रचार स्वातंत्र्य आहे. पण, एवढ इतरांच्यासाठी करून, जीवाचं रान करून कसं एकटं पाडण्याचा प्रयत्न काहीजण करतात, ते बघा", असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवार आणि सु्प्रिया सुळेंवर निशाणा साधला. 

"अवघ्या काही दिवसांत लोकसभेची निवडणूक जाहीर होईल. माझा अंदाज आहे की, मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागेल", असंही अजित पवार म्हणाले. 

ADVERTISEMENT

...तर राजकारणात माझी किंमत कमी होईल -अजित पवार

"काहींना आता दिसायला लागलं की, हे साधंसुध काम नाही. काहीजण सांगतील की, वर आम्हाला द्या. खालची निवडणूक आली, तर त्यांना द्या. मी मागेही सांगितलं की, मी आज देशपातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चालवत आहेत. उद्या माझ्या विचाराच्या उमेदवाराला काही डाग लागला, तर राज्याच्या राजकारणातही माझी किंमत कमी होईल आणि देशाच्या राजकारणातही माझी किंमत कमी होईल", अशी भूमिका त्यांनी मांडली. 

ADVERTISEMENT

"आपल्याला देशात एनडीएचं सरकार आणायचं आहे. त्या सरकारच्या माध्यमातून लोकसभा मतदारसंघाचा, देशाचा आणि महाराष्ट्राचा विकास करून घ्यायचा आहे. फक्त पार्लमेंटमध्ये भाषणं करून प्रश्न सुटत नाही. पार्लमेंटमध्ये भाषण करून, मी इथे न येता मुंबईत बसून भाषण करून उत्तम संसदपटू म्हणून किताब मिळवला असता आणि इथे कामं बघितली नसती, तर कामं झाली असती का?", असे म्हणत त्यांनी सुप्रिया सुळेंना टोला लगावला. 

अजित पवारांचं बारामतीतील संपूर्ण भाषण ऐकण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा

 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT