आप्पासाहेब धर्माधिकारींकडून शोक, पण मृत श्री सदस्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत नाहीच!

मुंबई तक

ADVERTISEMENT

appasaheb dharmadhikari only expressed his condolences financial assistance to families of deceased members has not been announced
appasaheb dharmadhikari only expressed his condolences financial assistance to families of deceased members has not been announced
social share
google news

मुंबई: ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना काल (16 एप्रिल) नवी मुंबईतील खारघर येथे भव्य कार्यक्रमात महाराष्ट्र भूषण (Maharashtra Bhushan) हा राज्य सरकारचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमासाठी 20 लाखांहून अधिक श्रीसदस्य हजर होते. ज्यापैकी 12 श्री सदस्यांचा उष्माघाताने मृत्यू झाला. त्यामुळे या संपूर्ण सोहळ्याला गालबोट लागलं आहे. तसेच आता या कार्यक्रमाच्या आयोजनावर देखील टीका केली जात आहे. याशिवाय या घटनेनंतर तब्बल 24 तासांनी आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी एक पत्रक काढून आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी घडलेल्या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. मात्र, ज्या श्रीसदस्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांना प्रतिष्ठानच्या वतीने अधिकृतरित्या कोणतीही आर्थिक मदत जाहीर करण्यात आलेली नाही. (appasaheb dharmadhikari only expressed his condolences financial assistance to families of deceased members has not been announced)

ADVERTISEMENT

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा हा सूर्यनारायण आक ओकत असताना भर दुपारी घेण्यात आला. तसंच येथे कोणतीही मंडप व्यवस्थाही नव्हती. त्यामुळे आलेल्या लाखो लोकांना उघड्यावरच बसावं लागलं. अशातच 100 हून अधिक जणांना उष्माघाताचा त्रास झाला आणि त्यातील 12 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

हे देखील वाचा – आप्पासाहेब धर्माधिकारींची ‘श्री समर्थ बैठक’ म्हणजे काय.. लाखो श्रीसेवक त्यांना का मानतात?

या घटनेबाबत काल रात्री 8 वाजेच्या सुमारास नेमकी माहिती समोर आली. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ नवी मुंबईतील एमजीए रुग्णालयात धाव घेतली. यावेळी त्यांनी उपचार घेत असलेल्या श्री सदस्यांची विचारपूस केली. तसंच पत्रकारांशी बोलताना त्यांनी मृत श्री सदस्यांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची आर्थिक मदत जाहीर केली. मात्र, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून कोणतीही आर्थिक मदत जाहीर झालेली नाही.

हे वाचलं का?

पाहा आप्पासाहेब धर्माधिकारींच्या पत्रकात नेमकं काय म्हटलंय

या घटनेनंतर मुंबई Tak ने आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याशी अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. अखेर घटनेच्या 24 तासानंतर त्यांच्या वतीने एक पत्रक जारी करण्यात आलं. पाहा या पत्रकात आप्पासाहेब धर्माधिकारी नेमकं काय म्हटलं आहे:

महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यासाठी खारघर येथे आलेले सारे श्री सदस्य हे माझ्या कुटुंबाचे सदस्य आहेत. श्री सदस्यांचा हा परिवार देश-विदेशात पसरला आहे. या पुरस्कार सोहळ्यावेळी उष्माघाताने काही श्री सदस्यांना त्रास झाला आणि त्यातील काहींचा दुर्दैवाने मृत्यू झाला. ही घटना माझ्यासाठी अत्यंत क्लेषदायक आहे. माझ्या कुटुंबातीलच सदस्यांवर कोसळलेली ही आपत्ती आहे. आपल्याच कुटुंबातील लोकांवर घाला येण्याच्या या घटनेने मी व्यथित आहे. माझे हे दु:ख शब्दात व्यक्त करण्यापलीकडचे आहे. मृत्यू झालेल्या या सदस्यांच्या कुटुंबीयांची आणि माझी वेदना सारखीच आहे. श्री सदस्य परिवाराची एकमेकांच्या सोबत राहण्याची पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे त्यानुसार आम्ही सारे जण या आपदग्रस्तांसोबत कायम आहोत. यातील मृतांना सद्गती लाभो, तसेच त्यांच्या कुटुंबाला हा आघात सहन करण्याची शक्ती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. झाला प्रकार दुर्दैवीच होता. त्याचे कोणत्याही पद्धतीने राजकारण होऊ नये. अशी आमची अपेक्षा आहे.

ADVERTISEMENT

असं आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.ॉ

ADVERTISEMENT

हे देखील वाचा – महाराष्ट्र भूषण सोहळा: 12 श्री सदस्यांच्या मृत्यूवर अमित शाहा म्हणाले, माझं मन…

‘श्री सदस्य हे माझ्या कुटुंबाचे सदस्य…’, पण…

दरम्यान… या पत्रकात आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी श्री सदस्य हे आपल्याच कुटुंबातील असल्याचं म्हटलं आहे. मात्र, या पत्रकातून तरी मृतांच्या नातेवाईकांना कोणतीही आर्थिक मदत जाहीर केलेली नाही.

हे देखील वाचा – Appasaheb Dharmadhikari : पुरस्कार 25 लाखांचा, अन् खर्च 14 कोटींचा; शिंदे सरकारचा अजब कारभार

आप्पासाहेब धर्माधिकारीच्या समर्थ बैठकीचे मोठ्या प्रमाणात श्री सदस्य आहेत. तसेच त्यांची बरीच सामाजिक कामं ही प्रतिष्ठानच्या माध्यमातून केली जातात. असं असताना आता मृतांच्या नातेवाईकांना प्रतिष्ठानाच्या माध्यमातून काही तरी मदत केली जावी अशी भावना सामान्य नागरिकांकडून व्यक्त केली जात. यामुळे आता तरी तशी आर्थिक मदत जाहीर केली जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT