Beed Accident : अ‍ॅम्ब्युलन्सचा चेंदामेंदा… ट्रॅव्हल्स उलटली; 10 जणांना काळाने रस्त्यातच गाठलं

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

beed accident news ambulance hit truck and travels reversed 10 people dies ashti fata shocking story
beed accident news ambulance hit truck and travels reversed 10 people dies ashti fata shocking story
social share
google news

Beed Accident News : बीड (Beed) जिल्हा गुरूवारी पहाटे दोन भीषण अपघाताने हादरला आहे. या दोन्ही घटना बुधवारी मध्यरात्री आणि गुरूवारी पहाटे घडल्या आहेत. या अपघाताची भीषणता इतकी होती की, दोन्ही अपघातात 10 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पहिल्या अपघातात एका अ‍ॅम्ब्युलन्सचा पुरता चेंदामेंदा झालाय. या अ‍ॅम्ब्युलन्समधून प्रवास करणाऱ्या 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. बीड नगर राज्य महामार्गावरील दौलावडगावनजीक हा अपघात घडला आहे. तर दुसरी अपघाताची घटना आष्टी फाटा येथे घडलीय. या अपघातात एक ट्रॅव्हल्स बस उलटल्याची घटना घडली आहे. या अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दोन्ही अपघाताच्या घटनांनी बीड हादरलंय. (beed accident news ambulance hit truck and travels reversed 10 people dies shocking story)

आष्टी तालुक्यातील अंभोरा हद्दीतील दौलावडगाव शिवारात दत्त मंदिराजवळ एक ट्रक (क्र. एम.एच. डी 8600) हा धामणगावकडून अहमदनगर दिशेने जात होता. रात्री साडे अकरा वाजे दरम्यान व्यंको कंपनीकडे डाव्या बाजूने वळण घेत असताना ट्रकला पाठीमागून आलेल्या अ‍ॅम्ब्युलन्सने (क्र. एम.एच.16 टी 9507 ) जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात रुग्णवाहिका चालक भरत सिताराम लोखंडे, (वय 35) रा. धामणगाव ता. आष्टी, मनोज पांगु तिरपुडे, पप्पु पांगु तिरखंडे, दोघेही राहणार जाट देवळा, ता. पाथर्डी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर डॉ. राजेश बाबासाहेब झिंजुर्के, (वय 35) राहणार सांगवी पाटण, ता. आष्टी यांचा मॅक केअर हॉस्पिटल अहमदनगर येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर ज्ञानदेव सूर्यभान घुमरे, (वय 45), रा. घाटा पिंपरी, ता. आष्टी हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या मॅक केअर हॉस्पिटल अहमदनगर येथे उपचार सुरु आहेत. दरम्यान या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना अहमदनगर येथील रूग्णालयात उपचाराखातर दाखल केले आहे.

हे ही वाचा : Gunaratna Sadavarte यांच्या गाड्या बीडमधील तरुणांनी फोडल्या, सरपंचाला अटक

आष्टी फाट्यात ट्रव्हल्सला अपघात

दुसऱ्या अपघातात मुंबईवरून बीडकडे जात असलेल्या सागर ट्रॅव्हल्सचा ताबा सुटल्याने बस उलटल्याची घटना घडली होती. आष्टी पोलिस ठाणे हद्दीतील आष्टा फाटा नजीक सकाळी सहाच्या दरम्यान ही घटना घडली आहे. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत असून अनेक जण जखमी आहेत. सध्या या अपघातातील जखमींवर आष्टी जामखेड येथे उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा अधिक तपास सूरू आहे

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Surat Diamond Bourse: गुजराती व्यापाऱ्यांचा मुंबईला प्रचंड मोठा धक्का, ‘हिरा’ व्यापार हिरावला!

    follow whatsapp

    ADVERTISEMENT