Maratha Reservation : तरुण शेतात गेला अन्…, ‘ते’ दृश्य पाहून आईने फोडला हंबरडा

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

beed youth commit suicide for maratha reservation demant cm ekanth shinde manoj jarange patil
beed youth commit suicide for maratha reservation demant cm ekanth shinde manoj jarange patil
social share
google news

Beed Youth commit suicide for maratha reservation : बीड : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यावरून सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी चांगलाच आक्रमक झाला आहे. असे असतानाच आरक्षणाच्या मागणीसाठी एका मागून एक मराठा तरूण आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलंत आहेत.अशीच एक घटना आता बीडमधून समोर आली आहे. बीडमध्ये (Beed) एका मराठा तरूणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शरद अशोक मते (वय 21) असं आत्महत्या केलेल्या मराठा तरूणाचे नाव आहे. या घटनेने बीडमध्ये हळहळ व्यक्त होतेय. (beed youth commit suicide for maratha reservation demand cm ekanth shinde manoj jarange patil)

ADVERTISEMENT

बीडमध्ये (Beed) मराठा आरक्षणासाठी शरद अशोक मते या तरूणाने आत्महत्या केल्याची दुदैवी घटना घडली आहे. ही घटना तालुक्यातील नाथापूर पासून जवळच असलेले शहाजानपूर सहजपूर लोणी येथे घडलीय. 24 ऑक्टोबरच्या दुपारी 2 वाजता शरदने शेतात जाऊन आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं आहे.

हे ही वाचा : Dasara Melava: ‘ठाकरेंनी पवार साहेबांकडे दोन माणसं पाठवलेली..’, मुख्यमंत्री पदावरून शिंदेंचा गौप्यस्फोट

दरम्यान मुलगा शरद कुठेच सापडत नसल्याने आईने शेतात जाऊन पाहिले असता तिने जोरजोरात रडायला सुरूवात केली. आईचा हंबरडा एकूण गावात ही घटना उघडकीस आली. या घटनेची माहिती पिंपळनेर पोलीस स्टेशनला देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठत मृतदेह खाली उतरवला. यावेळी मृतदेहाची तपासणी करणयात आली. या तपासणी दरम्यान पोलिसांना शरदच्या खिशात एक चिठ्ठी आढळली. या चिठ्ठीत मराठा आरक्षण सरकार देत नाही याच्या विरोधात आत्महत्या करत आहे असा मजकूर लिहिलेला असल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे.

हे वाचलं का?

दरम्यान सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या मुद्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षणाबाबत सकारात्मकता दाखवत मराठा तरूणांना आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनानंतर देखील मराठा तरूण आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत आहे.

हे ही वाचा : मुख्यमंत्र्यांनी मध्येच भाषण थांबवून शिवरायांची घेतली शपथ, नेमकं प्रकरणं काय?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT