Video : बॉम्बस्फोटाने बंगळुरु हादरलं! हादरवून टाकणारे सीसीटीव्ही फुटेज समोर
Bengaluru rameshwarm cafe blast : बंगळुरूच्या ब्रुकफील्ड परिसरात असलेल्या प्रसिद्ध रामेश्वर कॅफेत स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या स्फोटोत कॅफेतील स्फोटात अनेक नागरीक जखमी झाल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT
Bengaluru rameshwar cafe blast : बंगळुरूच्या ब्रुकफील्ड परिसरात असलेल्या प्रसिद्ध रामेश्वर कॅफेत स्फोट झाल्याची घटना घडली आहे. हा स्फोट इतका भीषण होता संपूर्ण कॅफेत धुरांचे लोण पसरले आहे. या स्फोटोत 9 हुन अधिक नागरीक जखमी झाले आहेत. या जखमींना उपचारासाठी नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. दरम्यान या सपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (siddaramaiah) यांनी कॅफेत बॉम्बस्फोट (rameshwar cafe) झाल्याची माहिती दिली आहे. (bengaluru rameshwarm cafe blast cctv footage karnatak cm siddaramaiah reaction)
ADVERTISEMENT
रामेश्वर कॅफेत हे बंगळुरुतलं सर्वात प्रसिद्ध कॅफे आहे. या कॅफेत नेहमीच नागरीकांची वर्दळ असते. शुक्रवारी दुपारी अशीच वर्दळ कॅफेत होती. नागरीक कॅफेचा आनंद लुटत होते, तर कॅफेचे कर्मचारी नागरीकांना सर्विस देत होते.या दरम्यानच कॅफेत बॉम्बस्फोट झाल्याची घटना घडली आहे.
हे ही वाचा : 'आधी तयारी करून...', घोसाळकरांची हत्या, फडणवीसांनी सांगितली सगळी कहाणी
हा स्फोट इतका भयानक होता की कॅफेच्या चारी बाजुला धुरांचे लोण पसरले होते. तसेच स्फोटाचा आवाज येताच नागरीक आपला जीव मुठीक धरून पळत होते. या स्फोटात अनेक जण जखमी झाले आहेत. या जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. आणि जखमींवर सध्या उपचार सुरु आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
जखमींचा आकडा आला समोर
या स्फोटात स्वर्णंम्बा (49) नावाची महिला 40 टक्के भाजली आहे. तिच्यासह अन्य जखमींमध्ये कॅफे कर्मचारी फारुख (19), ॲमेझॉन कंपनीचे कर्मचारी दीपांशू (23), मोहन (41), नागश्री (35), मोमी (30), बलराम कृष्णन (31), नव्या (5), श्रीनिवास (67) हे देखील गंभीररीत्या जखमी झाले आहेत. या जखमींना तत्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सूरू आहेत.
ADVERTISEMENT
मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया काय?
बंगळुरुतील कॅफेतील स्फोटातील घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या घटनेला बॉम्बस्फोट म्हटलं आहे. दरम्यान पोलिसांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या माहितीनुसार, कॅफेतील एका बॅगेत स्फोटक ठेवण्यात आले होते. तसेच सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती कॅफेत बॅग ठेवताना दिसला आहे.या स्फोटका ऐवजी इतर कोणतीही गोष्ट कॅफेत नव्हती.
हे ही वाचा : 50 कोटी ते... शेवटच्या दिवशी CM शिंदे ठाकरेंवर बरसले!
मुख्यमंत्री सिद्धरामय्या या घटनेवर म्हणाले की, ज्या व्यक्तीने कॅफेत बॅग ठेवली होती, तो व्यक्तीला सीसीटीव्ही फुटेजमध्ये कॅश काऊंटवर टोकन घेताना दिसला आहे. या प्रकरणी आता कॅशिअरशी चौकशी केली जात आहे. या स्फोटोत कॅफेचा स्टाफ आणि ग्राहकही जखमी झाला आहे. मात्र त्यांची जखम इतकी गंभीर नाही आहे, असे सिद्धरमय्या यांनी सांगितले आहे.
दरम्यान या स्फोटानंतर लगेचच फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली आणि पुरावे गोळा करत आहेत. तसेच स्फोट घडवून आणणाऱ्या घटनांचा शोध घेण्यासाठी पोलिस जवळपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासत आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT