Govt Jobs : भारत सरकारच्या कंपनीतील नोकरीची ही संधी सोडू नका, महिन्याला 1 लाखांहून अधिक पगार
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती सुरु झाली आहे. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 40,000 ते 1,40,000 रुपयांपर्यंत वेतन दिले जाणार आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये नोकरीची संधी
काय आहेत पात्रतेचे निकष?
जाणून घ्या सविस्तर
BEL Recruitment : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) ने देशातील तरुणांसाठी रोजगाराची एक मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. कंपनीने एकूण 350 प्रोबेशनरी इंजिनिअर (Probationary Engineer) पदांसाठी अधिकृत भरती जाहीर केली आहे. यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स शाखेसाठी 200 जागा आणि मेकॅनिकल शाखेसाठी 150 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. इंजिनिअरिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम सुवर्णसंधी आहे.
पात्रतेचे निकष
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची संबंधित शाखेतील 4 वर्षांची बी.ई. (B.E), बी.टेक (B.Tech) किंवा बी.एस्सी इंजिनिअरिंग (B.Sc Engineering) पदवी असणे आवश्यक आहे. वयोमर्यादेबाबत बोलायचे झाल्यास, सामान्य (General) आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) घटकातील उमेदवारांचे कमाल वय 25 वर्षांपेक्षा जास्त नसावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सूट दिली जाईल.
हे ही वाचा : पूर्णेकर हत्या प्रकरण: नगरसेविका पद सोडलंच नाही, मीनाक्षी शिंदेंकडून फक्त शिवसेनेच्या 'या' पदाचा राजीनामा!
वेतन किती मिळणार?
भरती प्रक्रियेसाठी अर्ज शुल्क प्रवर्गांनुसार ठरवण्यात आले आहे. सामान्य, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 1100 रुपये अर्ज शुल्क आकारले जाईल. तर अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), दिव्यांग (PwBD) आणि माजी सैनिक (Ex-Servicemen) उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरावे लागणार नाही. या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 40,000 ते 1,40,000 रुपयांपर्यंत आकर्षक वेतन दिले जाईल.
हे ही वाचा : प्रत्येक कर्मचाऱ्याच्या खात्यावर 33,000 RS दिवाळी बोनस, कोणता सरकारी विभाग देतोय गिफ्ट?
'असा' करा अर्ज
या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. संपूर्ण भारतात कुठेही काम करण्याची तयारी असलेल्या उमेदवारांनी 18 नोव्हेंबरपूर्वी आपले अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. भरतीबाबत अधिक सविस्तर माहिती आणि ऑनलाइन अर्जासाठी उमेदवारांनी कंपनीच्या अधिकृत bel-india.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
