मुंबईची खबर : सार्वजनिक ठिकाणी कचरा करणाऱ्यांची खैर नाही, BMC वापरणार 'स्मार्ट' फॉर्म्युला!
BMC ने सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांना शोधण्यासाठी 'एआय' (AI) तंत्रज्ञानावर आधारित कॅमेरे बसवले आहेत. याचे स्वागत होत असतानाच, वारंवार नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणीही केली जात आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बीएमसीचा मोठा निर्णय
सार्वजनिक ठिकाणी कचरा करणाऱ्यांवर कॅमेऱ्यांची नजर
Mumbai News : मुंबईकरांनो सार्वजनिक ठिकाणी कचरा करत असाल तर सावधान! सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या नागरिकांना शिस्त लावण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) आता AI तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. यासाठी महापालिकेने विशेष 'स्मार्ट कॅमेरे' बसवले असून, हे कॅमेरे कचरा टाकणाऱ्या व्यक्तीला लगेच ओळखून त्याला लाऊडस्पीकरद्वारे त्वरित सूचना आणि इशारा देतात.
व्हिडीओ केला पोस्ट
महापालिकेच्या जी/नॉर्थ (G/North) वॉर्डाने माहिम येथील डॉ. रायकर मार्गावरील गजानन वाटिका येथे हा प्रयोग राबवला आहे. ही जागा मुंबईतील प्रमुख 'कचरा संवेदनशील ठिकाणांपैकी' (GVPs) एक मानली जाते. पालिकेने त्यांच्या अधिकृत 'X' (ट्विटर) अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला प्लास्टिकची पिशवी टाकून जाताना दिसते आणि सीसीटीव्हीमधील एआय सिस्टीम लगेचच त्या व्यक्तीच्या हालचालींवर लक्ष ठेवून तिला ओळखते.
हे ही वाचा : "आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या अंत्यविधीला जाऊ नये", संजय गायकवाड पुन्हा बरळले
नागरिकांकडून स्वागत
हे AI कॅमेरे कचरा टाकण्याच्या उद्देशाने येणाऱ्या व्यक्तींना तात्काळ ओळखतात आणि ध्वनिवर्धकावरून परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करतात. महापालिकेच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सोशल मीडियावर नागरिकांकडून मोठे स्वागत झाले आहे. या प्रयोगाच्या यशानंतर, मुंबईतील इतर विविध भागांमधील कचराप्रवण ठिकाणीही अशाच प्रकारचे स्मार्ट कॅमेरे बसवण्याची पालिकेची योजना आहे.
हे ही वाचा : “डिलीटेंद्र..”, नागपूरमध्ये काँग्रेसचा विजय होताच महाराष्ट्र काँग्रेसचं फडणवीसांना प्रत्युत्तर
नागरिकांच्या प्रतिक्रिया काय?
सोशल मीडियावर या उपक्रमाचे कौतुक होत असले तरी, काही नागरिकांनी यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. केवळ तोंडी इशारे देऊन चालणार नाही, तर इशारा देऊनही कचरा टाकणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई केली पाहिजे, असा सल्ला काही वापरकर्त्यांनी दिला आहे. तर काहींनी मिश्कीलपणे, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांच्या कार्यालयातही असे कॅमेरे लावावेत अशी टिप्पणी केली आहे.
