Bharat Ratna 2024 : मोदी सरकारचा मोठा निर्णय! पी व्ही नरसिंहरावांसह तीन नेत्यांना भारतरत्न

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

मोदी सरकारने नरसिंह राव, चौधरी चरण सिंह आणि एमएस स्वामिनाथन यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची घोषणा केली.
modi Government has announced to give Bharat Ratna to former PM Narasimha Rao, Chaudhary Charan Singh and scientist MS Swaminathan.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मोदींनी ट्विट करून तिन्ही व्यक्त केल्या भावना

point

पीव्ही नरसिंह राव, चौधरी चरण सिंह, एमएस स्वामिनाथन

point

मोदी सरकारने तीन व्यक्तींना जाहीर केला भारतरत्न

Bharat Ratna 2024 Breaking News : कर्पुरी ठाकूर आणि लालकृष्ण आडवाणी यांच्यापाठोपाठ आणखी तीन व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. (Chaudhary Charan Singh, PV Narasimha Rao and MS Swaminathan will be conferred with Bharat Ratna)

ADVERTISEMENT

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने हा निर्णय घेतला असून, पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करून याची माहिती दिली. 

भारताचे माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव, माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांच्यासह हरित क्रांतीचे जनक एम.एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. 

हे वाचलं का?

चौधरी चरण सिंह यांच्या कार्याला दिला उजाळा

चौधरी चरणसिंग यांचे स्मरण करत पंतप्रधान मोदींनी ट्विट केले आहे. मोदींनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, "देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येत आहे, हे आमच्या सरकारचे भाग्य आहे. हा सन्मान त्यांनी देशासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाला समर्पित आहे."

"त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि कल्याणासाठी समर्पित केले होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असो वा देशाचे गृहमंत्री आणि आमदार म्हणूनही त्यांनी राष्ट्र उभारणीला नेहमीच गती दिली. आणीबाणीच्या विरोधातही ते ठामपणे उभे राहिले. आपल्या शेतकरी बंधू-भगिनींप्रती त्यांचे समर्पण आणि आणीबाणीच्या काळात लोकशाहीप्रती असलेली त्यांची बांधिलकी संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे", अशा भावना मोदींनी भारतरत्न जाहीर करताना व्यक्त केल्या.

ADVERTISEMENT

खरे तर आरएलडीचे प्रमुख जयंत सिंह यांचे आजोबा आणि शेतकऱ्यांचे मसिहा आणि माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांना भारतरत्न देण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. जयंत चौधरी यांनी पंतप्रधानांच्या घोषणेवर पोस्ट करत लिहिले, 'मन जिंकले!'

ADVERTISEMENT

नरसिंह राव यांच्याबद्दल पंतप्रधानांची खास पोस्ट

काँग्रेस नेते आणि माजी पंतप्रधान नरसिंह राव यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "हे कळवताना आनंद होत आहे की, आमचे माजी पंतप्रधान श्री पीव्ही नरसिंह राव गरू यांना भारतरत्नने सन्मानित करण्यात येणार आहे. एक प्रतिष्ठित विद्वान आणि राजकारणी म्हणून नरसिंह राव गरू यांनी विविध पदांवर भारताची मोठ्या प्रमाणावर सेवा केली."

"आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि अनेक वर्षे संसद व विधानसभा सदस्य म्हणून त्यांनी केलेल्या कार्यासाठी ते तितकेच स्मरणात आहेत. भारताला आर्थिकदृष्ट्या प्रगत बनवण्यात आणि देशाच्या समृद्धी आणि विकासाचा भक्कम पाया रचण्यात त्यांचे दूरदर्शी नेतृत्व महत्त्वपूर्ण ठरले", असे मोदींनी म्हटले.

पीएम मोदींनी पुढे लिहिले की, "नरसिंह राव गरू यांचा पंतप्रधान म्हणून कार्यकाळ भारताला जागतिक बाजारपेठेसाठी खुला करणारी महत्त्वपूर्ण पावले उचलण्यासाठी ओळखला जातो, ज्यामुळे आर्थिक विकासाच्या नवीन युगाला चालना मिळाली. शिवाय भारताचे परराष्ट्र धोरण, भाषा आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान एक नेता म्हणून त्यांचा बहुआयामी वारसा अधोरेखित करते ज्याने केवळ महत्त्वपूर्ण बदलांद्वारे भारताचे नेतृत्व केले नाही तर त्याचा सांस्कृतिक आणि बौद्धिक वारसा देखील समृद्ध केला."

स्वामीनाथन यांनी भारतीय शेतीचे स्वरूप बदलून टाकलं -मोदी

हरित क्रांतीचे जनक डॉ. एमएस स्वामीनाथन यांचे स्मरण करताना पंतप्रधान मोदींनी लिहिले की, "भारत सरकारने डॉ. एमएस स्वामीनाथन यांना आपल्या देशातील कृषी आणि शेतकरी कल्याणातील उल्लेखनीय योगदानाबद्दल भारतरत्न देऊन सन्मानित केले आहे. ही अतिशय आनंदाची बाब आहे. त्यांनी आव्हानात्मक काळात भारताला कृषी क्षेत्रात स्वावलंबी होण्यासाठी मदत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि भारतीय शेतीच्या आधुनिकीकरणासाठी उत्कृष्ट प्रयत्न केले."

पंतप्रधानांनी पुढे लिहिले आहे की, "आम्हाला त्यांचे एक नवोदित आणि मार्गदर्शक म्हणून आणि अनेक विद्यार्थ्यांमध्ये शिक्षण आणि संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचे अमूल्य कार्य माहित आहे. डॉ. स्वामीनाथन यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने केवळ भारतीय शेतीचाच कायापालट केला नाही तर देशाची अन्न सुरक्षा आणि समृद्धीही सुनिश्चित केली. ते मला जवळून ओळखत असे आणि मी नेहमी त्याच्या अंतर्दृष्टी आणि माहितीचा आदर केला", असे मोदींनी म्हटले आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT