नाद नाय करायचा! 639 कोटींना मुंबईत खरेदी केला देशातील सर्वात महागडा फ्लॅट..लीना तिवारी आहे तरी कोण?

मुंबई तक

Who is Leena Tewari : मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका महिलेच्या नावाची जोरदार चर्चा रंगलीय. या महिलेचं नाव आहे लीना तिवारी..देशातील प्रमुख फार्मा आणि बायोटेक कंपनी USV फार्मास्यूटिकल्सच्या त्या चेअरपर्सन आहेत.

ADVERTISEMENT

Who is Leena Tiwari
Who is Leena Tewari
social share
google news

बातम्या हायलाइट

point

देशातील सर्वात महागडा फ्लॅट खरेदी करणाऱ्या महिलेचा Business काय?

point

तब्बल 639 कोटी रुपयांना खरेदी केला फ्लॅट

point

लीना तिवारी यांच्याबद्दल जाणून थक्कच व्हाल

Who is Leena Tewari : मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका महिलेच्या नावाची जोरदार चर्चा रंगलीय. या महिलेचं नाव आहे लीना तिवारी..देशातील प्रमुख फार्मा आणि बायोटेक कंपनी USV फार्मास्यूटिकल्सच्या त्या चेअरपर्सन आहेत. डाएबिटीज आणि कोलेस्ट्रॉलची औषधांच्या बाजारात टॉप कंपनींच्या लिस्टमध्ये या कंपनीचं नाव आहे. पण लीना त्यांची कंपनी किंवा चमत्कारिक औषधांमुळे चर्चेत आली नाहीए. मग इंटरनेटवर का होतेय लीनाची तुफान चर्चा? जाणून घ्या याबाबत सविस्तर माहिती..

लीना तिवारीने मुंबईच्या वरळीत देशातील सर्वात महागडा फ्लॅट खरेदी केला आहे. वरळीच्या सी फेसिंग डुप्लेक्स अपार्टमेंटसाठी लीनाने 639 कोटी रुपये मोजले आहेत. स्टॅम्प ड्युटी आणि जीएसटीसाठी 63.9 कोटी रुपये अतिरिक्त दिले आहेत. म्हणजेच या फ्लॅटची किंमत एकूण 703 कोटी रुपये आहे. हा करार 28 मे रोजी करण्यात आला.

हे ही वाचा >> VIP गेस्टला 'एक्स्ट्रा सर्व्हिस' न दिल्याने झालेली अंकिता भंडारीचा हत्या, माजी BJP नेत्याचा मुलाला जन्मठेप

इकोनॉमिक टाईम्सनुसार, भारतातील आतापर्यंतचा सर्वात महागडा रेसिडेन्शियल अपार्टमेंट आहे. यामुळे भारतातील रिअल इस्टेट मार्केटमझ्ये एक नवा विक्रम कायम राहिला आहे. किंमतीनुसार, प्रॉपर्टी 2.83 लाख रुपये प्रति स्केअर फूटने विक्री करण्यात आलीय. ही 40 मजल्याची इमारत आहे. यामध्ये लीनाची संपत्ती 32 ते 35 व्या मजल्यापर्यंत आहे. 

कोण आहे लीना तिवारी?

USV कंपनीची चेअरमन लीना तिवारीचा भारतातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत समावेश आहे. फोर्ब्सच्या माहितीनुसार, लीनाचा नेटवर्थ 3.9 अरब डॉलर आहे. याशिवाय लीना स्वत:ला मीडिया, उद्योग आणि सामाजिक जगापासून दूर ठेवते. तिचे पती प्रशांत तिवारी USV मध्येच मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. ते ही लीनाप्रमाणेच शांत लो प्रोफाईल आहेत. लीना नीता अंबानी यांची खूप चांगली मैत्रिणही आहे.

हे ही वाचा >> मोठी बातमी! निलेश चव्हाणला अखेर नेपाळ बॉर्डरवरून अटक

लीनाचे कुंटुबिय USV कंपनी चालवतात. कंपनीचं फार्मास्यूटिकल मार्केटचा डाएबिटीज औषधांमध्ये खास दबदबा आहे. ही कंपनी फ्लॅगशिप औषधे जसं की, ग्लायकोमेट (डाएबिटीजचं औषध), ईकोस्प्रिन (ब्लड थिनर) रोजडे (कोलेस्ट्रोलचं औषध) साठी प्रसिद्ध आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये कंपनीचा रेव्हेन्यू 4840 कोटी इतका होता. 

हे वाचलं का?

    follow whatsapp