Lok Sabha : “ती महिला जागेवरच बेशुद्ध पडली”, खासदाराने सांगितला लोकसभेतील थरार

भागवत हिरेकर

Security breach in Lok Sabha News in Marathi : खासदाराकडून व्हिजिटिंग पास घेऊन लोकसभेचे कामकाज पाहण्यासाठी आलेल्या दोन तरुणांनी सभागृहात अक्षरशः धुडगूस घातला. दोन्ही तरुणांनी घोषणाबाजी केली. ज्या खासदाराने तरुणाला पकडलं, त्या खासदाराने सांगितल नेमकं काय घडलं?

ADVERTISEMENT

A case of major lapse in the security of Parliament has come to light in New Delhi today.
A case of major lapse in the security of Parliament has come to light in New Delhi today.
social share
google news

Security breach in Lok Sabha : दिल्लीत उभारण्यात आलेल्या नव्या संसद भवनात नाट्यमय थरार घडला. सुरक्षेत चूक झाल्याने लोकसभेत दोन तरुणांनी घुसखोरी केली. प्रेक्षक गॅलरीतून उड्या घेत दोन तरुण खासदारांच्या बाकांवरून पळत लोकसभा अध्यक्षांच्या आसनाकडे पळत सुटले. त्याचवेळी एका तरुणाने बुटात लपून ठेवलेली पिवळ्या रंगाचा गॅस फवारला. अचानक घडलेल्या या प्रकाराने खासदार हादरले. अनेकजण सभागृहाबाहेर धावत सुटले. पण, याचवेळी बसपाचे खासदार मलूक नागर यांनी काही खासदारांच्या मदतीने तरुणांच्या दिशेने धावले आणि त्यांना पकडले. मलूक नागर यांनी लोकसभेत नेमकं काय घडलं, त्याचा थरारक घटनाक्रम सांगितला. (BSP MP Malook Nagar narrated the entire incident of Lok Sabha security breach)

आजतक वृत्तवाहिनीशी बोलताना खासदार मलूक नागर यांनी सांगितलं की, “शून्य प्रहर संपण्यास पाच मिनिट बाकी होते. त्याचवेळी पाठीमागून धडाम् असा आवाज आला. एक तरुण उड्या मारतच समोर येत होता. त्यानंतर लगेच दुसरा तरुण उडी घेऊन धावायला लागला.”

हेही वाचा >> संसदेत घुसणाऱ्या तरुणाचं महाराष्ट्र कनेक्शन काय? सगळ्या प्रकरणाची चौकशी सुरू

Huge Parliament Security Breach, 4 People arrested in 2 Incidents
दोन तरुणांनी लोकसभेत उड्या घेतल्यानंतर उडालेला गोंधळ.

 

तोंड झाकून खासदार लागले पळायला -मलूक नागर

“मी आणि काही खासदार त्या तरुणांना पकडण्यासाठी पुढे धावलो. त्याचवेळी तरुणाने बूट काढला. आम्हाला वाटलं आता बूटाने मारणार. त्याचवेळी मनात आलं की, हा तरुण शस्त्र तर काढत नाहीये ना. त्यामुळे आम्ही क्षणाचाही विलंब न करता त्याला पकडलं. पण, तोपर्यंत त्याने काहीतरी फवारलं. सगळीकडे धूर झाला. सगळे लोक तोंड झाकून पळू लागले”, असे खासदार नागर यांनी सांगितले.

महिला सुरक्षारक्षक जागेवरच झाली बेशुद्ध

नागर पुढे म्हणाले की, “तितक्यात तिथे सुरक्षारक्षक आले. पण, जेव्हा त्या तरुणाने उडी मारली, तो एका महिला सुरक्षारक्षकावर पडला. आम्ही नंतर बघितलं तेव्हा ती महिला जोरजोरात रडत होती. म्हणत होती की, हा कुठून आला, हे मला कळलंच नाही. त्यानंतर ती बेशुद्ध झाली”, असा नाट्यमय घटनाक्रम त्यांनी आजतकशी बोलताना सांगितला.

हेही वाचा >> लोकसभेत घुसखोरी! टिअर गॅस फवारणारे ते दोघे कोण?

“दोन्ही तरुणांनी अचानक उड्या मारल्या. तानाशाही नहीं चलेंगी (हुकुमशाही चालणार नाही) अशा घोषणा देत ते पळत सुटले. त्यामुळे खासदार घाबरले. त्यांना पकडण्याची कुणाचीही हिंमत होत नाही. पण, नंतर मी आणि काही खासदारांनी त्यांना पकडलं. त्यानंतर तिथे सुरक्षारक्षक आले. सुरक्षारक्षकांनी त्यांना खूप मारले आणि तिथून घेऊन गेले”, असे नागर म्हणाले.

Lok Sabha Security breach latest news Update
लोकसभेत घुसखोरी झाल्यानंतर सभागृहातील परिस्थिती दाखवणारे दृश्ये.

“आज मृत्यू होऊ नये… “

सभागृहात असलेल्या एका खासदाराने सांगितले की, “आमच्या मनात असा विचार आला की, आज मृत्यू होऊ नये. मनात इतकाच विचार येत होता की, यांना रोखलं जावं. जेणेकरून काही वाईट घडू नये. त्यांना पकडल्यानंतर समजलं की एकाच नाव सागर आहे. आम्हाला इतक्याच सूचना दिल्या गेल्या, की जिथे आहात तिथेच राहा. बसलेले असाल, तर बसून राहा. उभे असाल तर उभेच राहा.”

हे वाचलं का?

    follow whatsapp