Maratha Reservation : 'इतकी तुला अक्कल नाही', भुजबळांची जरांगेंवर बोचरी टीका
Chhagan Bhujbal Challege Manoj jarange : 'तु जर खरा पाटील असशील तर मंडल आयोगाला संपवूनच दाखवं', असे थेट आव्हान छगन भुजबळांनी मनोज जरांगे पाटलांना दिले आहे. जरांगेंच्या या आव्हानाआधी त्यांनी ओबीसी समाजाला भुजबळांना समज देण्याचा सल्ला दिली होता.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
जरांगे पाटील स्वत:ला काय समजतो काय
...तर मंडल आयोगाला संपवूनच दाखवं
शशी कपूर म्हणाले असते हमारे पास शरद पवार है
Chhagan Bhujbal Challege Manoj jarange : राज्याने अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा मंडल आयोगावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांना आव्हान दिले आहे. 'तु जर खरा पाटील असशील तर मंडल आयोगाला संपवूनच दाखवं', असे थेट आव्हान छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) मनोज जरांगे पाटलांना (Manoj jarange) दिले आहे. जरांगेंच्या या आव्हानाआधी त्यांनी ओबीसी समाजाला भुजबळांना समज देण्याचा सल्ला दिली होता. (chhagan bhujbal direct challenge to manoj jarange patil on maratha reservation maharashtra politics)
ADVERTISEMENT
छगन भुजबळ हे माध्यमांशी बोलत होते. यावेळी मंडल आयोगावर बोलताना भुजबळांनी जरांगेना थेट आव्हानच दिले. 'तु खरा पाटील असशील तर मंडल आयोग संपवून दाखवं, असे थेट चँलेंज भुजबळांनी जरांगेंना दिले. 'तुला ओबीसीतून आरक्षण पाहिजे आणि त्या ओबीसी आरक्षणाचा निर्माता हे मंडल आयोग आहे. तिकडे त्याला संपवण्याची भाषा करतो आणि मग तु ओबीसीत कसा राहणार. तुला इतकी अक्कल पाहिजे. एवढी सुद्धा अक्कल नाही, त्या माणसाशी काय बोलायचं, अशी टीका देखील भुजबळांनी जरांगेवर केली आहे.
जरांगे पाटील स्वत:ला काय समजतो काय माहिती. प्रत्येकवेळी अल्टीमेटम अल्टीमेटम इकडे काय लोकशाही आहे की हुकुमशाही आहे. एकनाथ शिंदे तुमचे ऐकतात ना मग, जाना त्यांना विचार ना, असे देखील भुजबळ म्हणाले आहेत.
हे वाचलं का?
नाभिक समाजावरील त्या विधानावर छगन भुजबळांनी पुन्हा स्पष्टीकरण दिले. नाभिक समाजाच्या जेवढ्या संघटना आहेत. तेवढ्या सगळ्या संघटनांनी पत्रक काढून सांगितलं, आम्ही मिटींगला आणि रँलीला हजर होतो आणि भूजबळ साहेब असं कधीही म्हणाले नाहीत, असे भुजबळांनी सांगितले. तसेच नाभिक समाजाने मराठा समाजावर बहिष्कार टाकाव असे कुठेही ते म्हणाले नाही. एका गावामध्ये नाभिक समाजाच्या माणसाने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली होती, त्यामुळे तेथील गावातील मराठा समाजाने असा आदेश दिला होता. या दुकानामध्ये केस कापायचे नाही. तेव्हा मी म्हटलं, असा जर बहिष्कार कुणी टाकतं असेल तर, मग त्यांनी सुद्धा सांगाव, जर तुम्ही त्याच्यावर बहिष्कार टाकणार असाल तर, आम्ही तुमच्यावर बहिष्कार टाकू. हे सगळ्यांनी मान्य केलं. या सगळ्या संघटनांनी पत्रकसुद्धा काढली. पण एक दोन जे खोडसाळ होते त्यांनी 'ध' चा 'मा' करून सगळ्या महाराष्ट्रामध्ये एक वेगळे वातावरण निर्माण केले होते, असे भुजबळ यांनी सांगितले.
रोहित पाटील यांनी शरद पवारच आमचा पक्ष असल्याचे विधान केले होते. या विधानावर प्रतिक्रिया देताना भुजबळ म्हणाले की, मला सिनेमा आठवतो अमिताभ बच्चन आणि शशी कपूर असते तर ते म्हणाले असते. 'हमारे पास गाडीया है, हमारे पास मंत्री हे, हमारे पास गव्हरमेंट हे. सत्ता है हमारे पास पार्टी है हमारे पास, तुम्हारे पास क्या है? शशी कपूर म्हणाले असते हमारे पास शरद पवार है, असा टोला देखील भुजबळ यांनी शरद पवार गटाला लगावला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT