जिची हत्या केली म्हणून तुरुंगात गेला, ती तरुणी बॉयफ्रेंडसोबत आलिशान घरात सापडली, पोलिसही चक्रावले

Crime News : जिची हत्या केली म्हणून तुरुंगात गेला, ती तरुणी बॉयफ्रेंडसोबत आलिशान घरात सापडली, पोलिसही चक्रावले

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

जिची हत्या केली म्हणून तुरुंगात गेला

point

ती तरुणी बॉयफ्रेंडसोबत आलिशान घरात सापडली

point

पोलिसही चक्रावले

बिहारमध्ये एका व्यक्तीच्या आयुष्यात खळबळ उडवणारा प्रकार घडलाय. ज्याच्यावर स्वतःच्या पत्नीच्या हत्येचा आरोप लागला आणि त्यामुळे गेली चार महिने तो कारागृहात होता. तीच पत्नी जिवंत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. इतकेच नव्हे, तर ती दिल्लीमध्ये आपल्या प्रियकरासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचे उघड झाल्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी त्या तरुणीला आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले असून दोघांना दिल्लीहून बिहारला आणण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही घटना मोतिहारी जिल्ह्यातील अरेराज थाना क्षेत्रातील वार्ड क्रमांक 10 मधील आहे. महाबली चौक येथे राहणाऱ्या रंजीत कुमार यांचा विवाह हरसिद्धी ठाण्याच्या हद्दीतील कृतपुर मठिया येथील गुंजा देवीसोबत झाला होता. लग्नानंतर काही दिवसांतच गुंजा मोबाईलवर सतत कोणाशातरी अनोळखी व्यक्तीशी बोलत असल्याचे रंजीतला जाणवू लागले. त्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला.

अर्ध्या रात्री घरातून बेपत्ता

3 जुलै 2025 रोजी दाम्पत्यात पुन्हा वाद झाला. वादानंतर गुंजा देवी मध्यरात्री घरातून निघून गायब झाली. पत्नी हरवल्याची तक्रार रंजीत यांनी अरेराज पोलिस ठाण्यात नोंदवली. परंतु दोन दिवसांनी गुंजाच्या वडिलांनी थेट तिच्या हत्येचा आरोप करत रंजीतने मुलीचा खून करून मृतदेह लपवून ठेवल्याची तक्रार दाखल केली. यानंतर रंजीतवर पोलिसांची नजर व तपासाचा ताण वाढला. हत्येच्या शक्यतेमुळे घाबरलेल्या रंजीतने अखेर घटनाप्रसंगानंतर आठवड्यातच न्यायालयात आत्मसमर्पण केले. त्यानंतर तो तुरुंगातच होता. पोलिसांनीही हत्येचा गुन्हा असल्याचा संशय धरण्यात वेळ घालवला नाही.

हेही वाचा : ज्योतिषशास्त्रानुसार काही राशीतील लोकांना आपले प्रेम मिळणार, 'त्या' व्यक्तीची भेटगाठ होऊन दिवस सार्थकी जाणार

तुरुंगात पती, आणि पत्नी दिल्लीमध्ये प्रियकरासोबत!

दरम्यान, रंजीतच्या कुटुंबीयांनी गुंजाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले. आधुनिक तांत्रिक साधनांचा वापर करून पोलिसांनी गुंजा दिल्लीमध्ये असल्याचे लोकेशन ट्रेस केले. सोमवारी पोलिस पथकाने दिल्लीमध्ये धाड टाकून गुंजा देवी आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले. हा प्रियकर देखील गुंजाच्या गावातील असल्याचे समोर आले आहे. अरेराज ठाण्यातील अधिकारी प्रत्याशा कुमारी यांनी सांगितले की, गुंजाला बिहारमध्ये आणल्यानंतर न्यायालयात तिचे निवेदन नोंदवले जाईल. दोघांनाही दिल्लीहून परत आणण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील चौकशीने संपूर्ण प्रकरणाचा धागा उलगडेल.

या प्रकरणामुळे रंजीतच्या कुटुंबावर जणू दु:खाचा डोंगर कोसळले आहे. जिच्या ‘हत्या प्रकरणी’ तो तुरुंगात होता, ती पत्नी मात्र निवांत प्रियकरासोबत राहात असल्याचे उघडकीस आल्याने सर्वत्र हीच चर्चा सुरू आहे. पुढील तपासात गुंजा देवीने घर सोडण्यामागील कारणांपासून ते तिच्या कथित लिव्ह-इनच्या तपशीलांपर्यंत अनेक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

19 मिनिटांचा प्रायव्हेट क्षण असणारा व्हिडीओ व्हायरल, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर केली आत्महत्या? सत्य काय?