Datta Dalvi : ठाकरेंच्या नेत्याला घरातून अटक, शिंदेंवर काय केली होती टीका?
Datta dalvi latest news in marathi : ठाकरे गटाचे नेते आणि मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर अर्वाच्य भाषेत टीका केल्याप्रकरणी भांडुप पोलिसांनी त्यांना अटक केली.
ADVERTISEMENT
Datta Dalvi Arrested : मुंबईचे माजी महापौर आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते दत्ता दळवी यांना अटक करण्यात आली आहे. दत्ता दळवींना अटक केल्यानंतर ठाकरे गट आक्रमक झाला आहे. भांडुप पोलीस ठाण्याबाहेर ठाकरे गटाचे नेते, पदाधिकारी आणि शिवसैनिक जमा झाले आहेत. अटकेच्या कारवाईवरून संजय राऊत शिंदे गटावर भडकले.
भांडुपमध्ये रविवारी (26 नोव्हेंबर) शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कोकण पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात माजी महापौर तथा उपनेते दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात विधान केले होते. या प्रकरणी बुधवारी (29 नोव्हेंबर) सकाळी आठ वाजता भांडुप पोलिसांनी त्यांना विक्रोळी येथील राहत्या घरातून अटक केली आहे.
दत्ता दळवींवर कोणत्या कलमान्वये गुन्हा?
भूषण पलांडे या व्यक्तीने दत्ता दळवी यांच्या भाषेवर आक्षेप घेत भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी भादंवि 153(A),153 (B),153(A)(1)सी,294, 504,505(1)(C) कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
दत्ता दळवी भाषणात शिंदेंबद्दल काय बोलले?
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते दत्ता दळवी मेळाव्यात बोलताना म्हणाले होते की, “आज मिंधे गट आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की, गद्दारीची कुऱ्हाड घेऊन मिंधे सरकार याठिकाणी आरूढ झालेले आहे.
हेही वाचा >> हिंदु हृदयसम्राट नव्हे तर हे ”गद्दार हृदयसम्राट”, राऊतांचा CM शिंदेंना टोला
“मला वाटतं आज कदाचित दिघे साहेब असते ना, तर मी सांगतो या एकनाथ शिंदेला चाबकाने फोडुन काढलं असतं. आम्ही सगळं बघितलेले आहे.”
ADVERTISEMENT
“एकनाथ शिंदे काय होता? एकनाथ बिंदे होता कुठे, काय करत होता; हे आम्ही स्वतः बघितलेले आहे. समजलं का मी स्वतः बघितलेले आहे. परतु बाळसाहेबांच्या जवळ आला. बाळासाहेबांनी आशिर्वाद दिले. उद्धवजींच्या जवळ आले, त्यांना उद्धवजींनी जवळ घेतले आणि त्यांनी एवढी मोठी गद्दारी केली. पक्षाशी गद्दारी केली”, अशी टीका दत्ता दळवींनी केली होती.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> Deepak Kesarkar अचानक का गेले नारायण राणेंच्या घरी? ‘त्या’ बॅगेतून राणेंना काय दिलं?
“नाव बाळासाहेबांचं वापरायचे. आता ते हिंदुहृदयसम्राट वापरत आहेत. अरे #@डीच्या तुला हिंदुहृदयसम्राटाचा अर्थ तरी माहिती आहे का?”, अशी टीका दत्ता दळवींनी शिंदेंवर टीका केली होती.
ADVERTISEMENT