धुळे हादरलं! आईनं दोन लेकरांसह विहिरीत उडी घेत उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक कारण आलं समोर
Dhule Suicide : धुळे तालुक्यातील निकुंभे शिवारातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आईने आपल्या दोन मुलांसह विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची मन हेलावून टाकणारा प्रकार उघडकीस आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पोलिसांची घटनास्थळी धाव
धुळे शहरात आणखी एक धक्कादायक प्रकार
Dhule Suicide : धुळे तालुक्यातील निकुंभे शिवारातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आईने आपल्या दोन मुलांसह विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची मन हेलावून टाकणारा प्रकार उघडकीस आला आहे. आई गायत्री आनंदा वाघ-पाटील (वय 27) मुलगा दुर्गेश (वय 6) मुलगी दुर्वा (वय 3) यांचा समावेश आहे. कौटुंबिक वादांमुळे नैराशातून हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती तपासातून समोर आली आहे. या घटनेनं परिसरातून एकच खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा : पैसा-पाणी: AI मुळे कोणाच्या नोकऱ्या जातील, कोणाच्या नोकऱ्या वाचतील?
पोलिसांची घटनास्थळी धाव
विहिरीत 30 ते 40 फूट खोल पाणी होते, घटनेची तत्काळपणे कोणालाच कल्पना झालेली नाही. तिघांचाही शोध घेताना त्यांचा तपास झाला नाही. त्यांना संशय निर्माण झाला आणि अखेर विवाहित तिघांचेही मृतदेह आढळून आले आहेत. या घटनेची माहिती पोलसांना मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, तपास सुरु केला.
आत्महत्येचं धक्कादायक कारण समोर
या प्रकरणात चौकशीतून समोर आले की, गायत्री ही अनेक दिवसांपासून मानसिक तणावात आपले जीवन जगत होती. कुटुंबातील वाद, मतभेद आणि नैराश्यात वाढ झाल्याने तिने टोकाचं पाऊल उचलल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. नेमकं कारण काय? याबाबत आता स्पष्टता झालेली नाही. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती समोर आली आहे.
धुळे शहरात आणखी एक धक्कादायक प्रकार
अशातच आता धुळे शहरात आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका महिलेनं गुंगीचे औषध देऊन लैंगिक अत्याचार केल्याचा आणि अत्याचाराचे चित्रीकरण समाज माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देत 59 लाख 99 हजार रुपये उकळण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडितेनं दिलेल्या तक्रारीनुसार, सुकलाल रामभाऊ बोरसे (वय 53) याने 2023 पासून ओळख निर्माण करून आर्थिक मदत करण्याचे आमिष दाखवले.










