McDonald कडून ग्राहकांची घोर फसवणूक, बर्गरमध्ये बनावट चीजचा वापर

सौरभ वक्तानिया

ADVERTISEMENT

महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मॅकडोनाल्डवर मोठी कारवाई केली आहे.  मॅकडोनाल्ड त्यांच्या खाद्यपदार्थांमध्ये बनावट चीज वापरत असल्याचे उघड झाले आहे.
fda big action aginst mcdonald fake cheese use in burger ahmednagar news
social share
google news

FDA Action Against McDonald : सौरभ वक्तानिया, मुंबई :  महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मॅकडोनाल्डवर मोठी कारवाई केली आहे.  मॅकडोनाल्ड त्यांच्या खाद्यपदार्थांमध्ये बनावट चीज वापरत असल्याचे उघड झाले आहे. अहमदमनगरमधील एका आऊटलेवर असा प्रकार समोर आला होता. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने या आउटलेटचा परवानाच रद्द केला आहे.  (fda big action aginst mcdonald fake cheese use in burger ahmednagar news) 

ADVERTISEMENT

अहमदनगर पुणे महामार्गावर केडगाव येथे मॅकडोनाल्डचे आऊटलेट आहे. या आउटलेटमध्ये खऱ्या चीजऐवजी बनावट चीज वापरले जात होते. दिवाळी दरम्यान एफडीआयने तपासणी केली असता बर्गरमध्ये डुप्लिकेट चीज आढळून आले होते. खर्च वाचवण्यासाठी कंपनी ग्राहकांची दिशाभूल करत होती. कंपनी चीजऐवजी खाद्यपदार्थ बनवण्यासाठी वनस्पती तेलाचा वापर करत होती. या संबंधित ग्राहकांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली आहे. तसेच या आऊटलेटचा परवानाही रद्द केला आहे. 

हे ही वाचा : दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील नातेवाईकाला गोळ्या घालून संपवलं

"आम्हाला खऱ्या पनीरऐवजी पनीर ॲनालॉग वापरण्याबाबत ग्राहकांकडून अभिप्राय मिळाला होता. त्यानंतर आम्ही तपास केला असता, तपासणीदरम्यान खऱ्या पनीरऐवजी वनस्पती तेलाचा (डालडा तेल) वापर केल्याचे आढळून आले होते, असे एफडीएचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी सांगितले. दरम्यान आयुक्तांनी स्पष्ट केले की, चीज बर्गरचे नाव दुकानाच्या मेनू कार्डमधून काढून टाकावे लागेल, कारण चीज बर्गरच्या नावावर तुम्ही बनावट चीज देऊन ग्राहकांची दिशाभूल करता आहात, हे कायद्याच्या विरोधात आहे, म्हणून मॅकडोनाल्डच्या मेनू कार्डमधून चीज हा शब्द काढावा लागेल, असे आयुक्तांनी आदेश दिले होते. 

हे वाचलं का?

कारवाईवर मॅकडोनाल्ड काय म्हणाले? 

मॅकडोनाल्ड्सकडून अधिकृत निवेदन देण्यात आले आहे की, मॅकडोनाल्ड्सवर महाराष्ट्रात एफडीआयने जो काही निर्णय दिला आहे, आम्ही आमच्या ग्राहकांना सांगू इच्छितो की आम्ही उच्च दर्जाचे चीज वापरतो. आमची अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे आणि आम्ही औषध कायद्यांचे काटेकोरपणे पालन करतो. .आम्ही आमच्या अन्नाला चांगले आणि चविष्ट अन्न देण्याचे वचन देतो.

हे ही वाचा : Manoj jarange : खडसेंचा गिरीश महाजनांवर गंभीर आरोप

याबाबत कंपनीने स्पष्टीकरण दिले असले तरी एफडीएने परवाना निलंबित केला. आता मॅकडोनाल्ड्सने एफडीएला पत्र लिहून पनीर हा शब्द काढून खाण्याचे नाव बदलल्याचे सांगितले आहे.खालीलप्रमाणे ही पदार्थाची नावे आहेत. 

ADVERTISEMENT

व्हेज नजेट्स (पूर्वीचे नाव - चीझी नजेट्स)
नॉनव्हेज बर्गर (पूर्वीचे नाव - मॅक चीज नॉनव्हेज बर्गर)
व्हेज डिलाईट बर्गर (पूर्वीचे नाव - मॅक चीज व्हेज डिलाईट बर्गर)
अमेरिकन व्हेज बर्गर (पूर्वीचे नाव – कॉर्न अ‍ॅण्ड चीज बर्गर)
अमेरिकन नॉन-व्हेज बर्गर (पूर्वीचे नाव - ग्रील्ड चिकन अ‍ॅण्ड चीज बर्गर)
ब्लू बेरी केक (पूर्वीचे नाव - ब्लू बेरी चीज केक)
इटालियन व्हेज बर्गर (पूर्वीचे नाव - इटालियन चीज व्हेज बर्गर)

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT