Manoj jarange : खडसेंचा गिरीश महाजनांवर गंभीर आरोप, 'सगे-सोयऱ्यांचा शब्द पाळला...'

मुंबई तक

ADVERTISEMENT

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे आणि भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात विळ्या भोपळ्यासारखं सख्ख आहे. दोघांमध्ये मुळीच विस्तव जात नसतो.
eknath khadse criticize girish mahajan on maratha reservation manoj jarange patil bjp raksha khadse maharashtra politics
social share
google news

Eknath Khadse vs Girish Mahajan, Maratha Reservation : मनीष जोग, जळगांव :  राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे आणि भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात विळ्या भोपळ्यासारखं सख्ख आहे. दोघांमध्ये मुळीच विस्तव जात नसतो. हे दोन्ही नेते एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नसतात. असे असतानाच आता एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनांवर जोरदार टीका केली आहे. 'मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणे शक्यच नाही, परंतू सगे सोयऱ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ, असे गिरीश महाजन यांनी लिहून दिल्यामुळे हा समाज आक्रमक झाला आहे. आणि यामुळेच जरांगेंवर आंदोलन करायची वेळ आली आहे', अशी टीका खडसेंनी( Eknath Khadse) महाजन (Girish Mahajan) यांच्यावर केली. (eknath khadse criticize girish mahajan on maratha reservation manoj jarange patil bjp raksha khadse maharashtra politics) 
 
एकनाथ खडसे मुंबई तकशी बोलत होते. यावेळी बोलताना एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनांवर निशाणा साधला. महाराष्ट्राच्या विधानसभेत मी भाषण करतानाच बोलेलो, सरकार मराठा समाजाची दिशाभूल करतेय. या समाजाला ओबीसीतून आरक्षण देणे शक्य नाही. परंतु सगेसोयऱ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ असे गिरीश महाजन यांनी लिहून दिल्यामुळे हा समाज आक्रमक झाला.आणि म्हणून जरांगेंवर आंदोलन करायची वेळ आली आहे, अशी टीका एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर केली. 

हे ही वाचा : पवारांचा एक फोन अन् बाळासाहेबांनी.. 'पंत' असे बनलेले CM

 मराठा समाजाला कोणत्याही स्थितीमध्ये ओबीसीतून आरक्षण देऊ नये,अशी भूमिका सर्वपक्षीय नेत्यांनी घेतलेली. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता, आरक्षण दिले पाहिजे, ही भूमिका सर्वपक्षीय नेत्यांनी मांडली आहे. त्यामुळे ओबीसीतून आरक्षण काढायचे आणि मराठा समाजाला द्यायचे, हे तुर्तास तरी सरकारला शक्य नाही आहे. सरकार प्रयत्न करत असेल ही, पण घटनेच्या चौकटीत राहून न्यायालयात टीकलं पाहिजे अशा स्वरूपाचे आरक्षण आज तरी हे सरकार देऊ शकत नाही, असे एकनाथ खडसे यांनी स्पष्टच सांगितले.

 रक्षाताईंच्या भाजप प्रवेशाच्या निमंत्रणावर काय म्हणाले? 

 रक्षाताई भाजपमध्ये असल्याने मी भाजपमध्ये यावं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. पण मला भाजपमध्ये आजतरी प्रवेश करायचा नाही आहे. मी गेले अनेक वर्ष भाजपसाठी काम केले, पण मधल्या कालखंडामध्ये काही कारणास्तव मला भाजपचा त्याग करावा लागला आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यावं लागलं होतं. आता शरद पवारांचे नेतृत्व मी मान्य केलेले आहे. त्यामुळे शरद पवारांसोबत मी पुढच्या कालखंडापर्यंत राहणार आहे, असे देखील एकनाथ खडसे यांनी सांगितले. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : 'राजीनामा द्या', बाळासाहेबांचा आदेश अन् जोशींनी सोडलं होतं मुख्यमंत्रीपद

 तसेच भाजपमध्ये गेल्यानंतर कारवाईतून सूटका मिळेल, हा भाग जर असता तर यापुर्वीच मी गेलो असतो आणि मला सुटका मिळाली असती. तसेच जर अशीच स्थिती असती तर ज्यावेळेस अजित पवार वेगेळे झाले, त्यावेळेस मी अजितदादांसोबत जाणे पसंत केले असते, असे देखील एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT