5 वर्षांनंतर घरी नवरा घरी परतला, पण बायकोच्या तोंडावर असिड फेकलं अन् स्वत:च्याही घशात असिड टाकलं
Crime News : पती-पत्नीमध्ये आधीपासूनच जमीन आणि कौटुंबिक कारणांवरून मतभेद सुरू होते. वादाच्या भरात संतापलेल्या दुलाल पोद्दारने पत्नी पूनम देवी यांच्यावर अॅसिड फेकलं. या हल्ल्यात पूनम देवी गंभीररीत्या भाजल्या गेल्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
5 वर्षांनंतर घरी नवरा घरी परतला, पण बायकोच्या तोंडावर असिड फेकलं
अन् स्वत:च्याही घशात असिड ओतलं आणि केली आत्महत्या
Crime News : बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील औद्योगिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राणी तलाव परिसरात एका कौटुंबिक वादाने अत्यंत धक्कादायक वळण घेतलंय. पाच वर्षांनंतर दिल्लीतून घरी परतलेल्या पतीने पत्नीवर अॅसिड फेकल्याची भीषण घटना घडली. या हल्ल्यानंतर पतीने स्वतःला खोलीत कोंडून घेतले. दुसऱ्या दिवशी दरवाजा उघडण्यात आला असता, त्या खोलीत पतीचा मृतदेह आढळून आला. त्यानेही अॅसिड प्राशन करून आत्महत्या केल्याची प्राथमिक शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
या घटनेत मृत पतीचे नाव दुलाल पोद्दार (वय 45) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुलाल पोद्दार गेल्या सुमारे पाच वर्षांपासून दिल्लीत मजुरीचे काम करत होता. 1 जानेवारी रोजी तो अचानक भागलपूरमध्ये घरी परतला. त्यानंतर त्याने पत्नी पूनम देवी यांना आता दिल्लीला न जाता याच ठिकाणी राहण्याचा आग्रह धरला. पूनम देवी या राणी तलाव परिसरात खासगी निवासी शाळा चालवत होत्या आणि त्या स्वतः त्या शाळेच्या प्राचार्य होत्या.
पतीच्या अचानक परतण्यामुळे आणि त्याच्या हट्टामुळे दोघांमध्ये वादाला सुरुवात झाली. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, पती-पत्नीमध्ये आधीपासूनच जमीन आणि कौटुंबिक कारणांवरून मतभेद सुरू होते. वादाच्या भरात संतापलेल्या दुलाल पोद्दारने पत्नी पूनम देवी यांच्यावर अॅसिड फेकलं. या हल्ल्यात पूनम देवी गंभीररीत्या भाजल्या गेल्या.
हेही वाचा : पुण्यातील सॉफ्टवेअर इंजीनिअरला जुगाराचा नाद... आर्थिक नुकसान अन् चार्जिंग केबलने फाशी घेत टोकाचं पाऊल!










