काँग्रेसशी युती केल्याने CM संतापले, पण लगेच भाजपने काँग्रेसचे 11 नगरसेवक फोडले, अंबरनाथमध्ये 12 तासात गेम फिरला
Ambernath Nagarpalika Election : काँग्रेससोबत स्थानिक पातळीवर युती झाल्याचे समजताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्थानिक नेत्यांवर चांगलेच संतापले होते. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर भाजप तेथे काँग्रेससोबतची युती तोडणार असल्याचे बोलले जात होते. मात्र,अवघ्या 12 तासांत राजकीय समीकरणे बदलत भाजपने काँग्रेसचे 11 नगरसेवक फोडल्याने अंबरनाथच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
काँग्रेसशी युती केल्याने CM संतापले
पण लगेच भाजपने काँग्रेसचे 11 नगरसेवक फोडले
अंबरनाथमध्ये 12 तासात गेम फिरला
Ambernath Nagarpalika Election : अंबरनाथ नगरपालिकेतील सत्तासंघर्षाने अवघ्या काही तासांत नाट्यमय वळण घेतलंय. भाजपने अंबरनाथ नगरपालिकेत बहुमताचा आकडा गाठण्यासाठी आणि शिंदेंच्या शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रससोबत युती केली होती. मात्र, काँग्रेससोबत स्थानिक पातळीवर युती झाल्याचे समजताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्थानिक नेत्यांवर चांगलेच संतापले होते. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर भाजप तेथे काँग्रेससोबतची युती तोडणार असल्याचे बोलले जात होते. मात्र,अवघ्या 12 तासांत राजकीय समीकरणे बदलत भाजपने काँग्रेसचे 11 नगरसेवक फोडल्याने अंबरनाथच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे.
अंबरनाथमध्ये 12 तासात गेम फिरला
मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेनंतर अवघ्या काही तासांत भाजपने जोरदार हालचाली करत काँग्रेसला मोठा धक्का दिला. अंबरनाथमधील काँग्रेसचे 11 नगरसेवकांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. नवी मुंबई येथे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला. भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांमध्ये प्रदीप नाना पाटील, दर्शना उमेश पाटील, अर्चना चरण पाटील, हर्षदा पंकज पाटील, तेजस्विनी मिलिंद पाटील, विपुल प्रदीप पाटील, मनीष म्हात्रे, धनलक्ष्मी जयशंकर, संजवणी राहुल देवडे, दिनेश गायकवाड, किरण बद्रीनाथ राठोड आणि कबीर नरेश गायकवाड यांचा समावेश आहे. या पक्ष प्रवेशावेळी मंत्री गणेश नाईक, संजीव नाईक आणि दीपेश म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. भाजपमध्ये प्रवेश करताना काँग्रेसचे गटनेते प्रदीप पाटील यांनी, “आम्ही काँग्रेसमध्ये होतो, मात्र अन्यायामुळे आणि अंबरनाथच्या विकासासाठी आम्ही भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे,” असे सांगितले. या घडामोडींमुळे अंबरनाथ नगरपालिकेतील सत्तासमीकरण पूर्णतः बदलले असून, अवघ्या 12 तासांत राजकीय ‘गेम’ फिरल्याचे स्पष्ट झाले आहे.
अंबरनाथ नगरपालिकेत भाजपने नगराध्यक्षपद मिळवल्यानंतर सत्ता स्थापन करण्यासाठी हालचालींना वेग आला होता. सर्वाधिक 27 नगरसेवक असलेल्या शिंदेसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यासोबत हातमिळवणी करत ‘अंबरनाथ विकास आघाडी’ स्थापन केली होती. या आघाडीची अधिकृत नोंदणी जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली होती. या आघाडीत भाजपचे 14, काँग्रेसचे 12, राष्ट्रवादी (अजित पवार) चे 4 आणि एक अपक्ष नगरसेवक असा मिळून 31 नगरसेवकांचा समावेश होता. नगराध्यक्ष धरून एकूण संख्या 32 इतकी होत होती. भ्रष्टाचारमुक्त आणि भयमुक्त कारभारासाठीच ही आघाडी स्थापन करण्यात आल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला होता.
काँग्रेससोबत युती केल्यानंतर फडणवीस काय म्हणाले होते?
मात्र, काँग्रेससोबत थेट युती केल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्थानिक भाजप नेतृत्वावर संतप्त झाल्याची माहिती समोर आली. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडत काँग्रेस आणि AIMIM सोबत कोणतीही युती मान्य नसल्याचे सांगितले. “काँग्रेस आणि AIMIM सोबतची युती चालणार नाही. स्थानिक पातळीवर कोणी अशी युती केली असेल तर ती चुकीची आहे. या प्रकरणात अनुशासनहीनता आहे आणि त्यावर कारवाई केली जाईल. मी याबाबत स्पष्ट आदेश दिले आहेत,” असे फडणवीस म्हणाले होते.










