मोठी बातमी : संजय राऊत समोर दिसले, एकनाथ शिंदेंचा नमस्कार,दोघांमध्ये काय चर्चा झाली? पाहा व्हिडीओ
Eknath Shinde and Sanjay Raut : संजय राऊत मुलाखत देऊन बाहेर पडत असताना एकनाथ शिंदे समोर आलेले पाहायला मिळाले. यावेळी एकनाथ शिदेंनी संजय राऊत यांना नमस्कार केला. शिवाय नंतर दोघांनी हस्तांदोलन केले आणि दोन मिनीटे विचारपूस केल्याचं पाहायला मिळालं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मोठी बातमी : संजय राऊत समोर दिसले, एकनाथ शिंदेंचा नमस्कार,
दोघांमध्ये काय चर्चा झाली? पाहा व्हिडीओ
Eknath Shinde and Sanjay Raut, मुंबई : ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईत सुरु असलेल्या 'आज तक मंथन'मध्ये समोरा-समोर आलेले पाहायला मिळाले. संजय राऊत यांची मुलाखत झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुलाखत होणार होती. दरम्यान, संजय राऊत मुलाखत देऊन बाहेर पडत असताना एकनाथ शिंदे समोर आलेले पाहायला मिळाले. यावेळी एकनाथ शिदेंनी संजय राऊत यांना नमस्कार केला. शिवाय नंतर दोघांनी हस्तांदोलन केले नंतर एकमेकांची विचारपूस देखील केली.
Sanjay Raut समोर येताच Eknath Shinde यांनी नमस्कार केला, तब्येतीची विचारपूस केली, काय घडलं? | BMC
हेही वाचा : 50 खोके म्हणजे काय? राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले, 40 आमदार म्हणजे..., सामनाच्या मुलाखतीत गणित मांडलं
संजय राऊत आजारी होते, तेव्हा एकनाथ शिंदेंनी केला होता फोन
नुकतेच गंभीर आजारातून बरे झालेले संजय राऊत आजारी असताना घरी असतानाच एकनाथ शिंदे यांनी त्यांचे बंधू सुनील राऊत यांना फोन करून राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली होती. त्यानंतर आज झालेल्या कार्यक्रमात संजय राऊत थेट एकनाथ शिंदे यांच्यासमोर आले. यावेळी शिंदे यांनी पुन्हा एकदा त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारपूस केली. त्यावर संजय राऊत यांनीही एकनाथ शिंदे यांच्या तब्येतीची चौकशी केली. दोघांमध्ये काही क्षण औपचारिक संवाद झाल्यानंतर हे नेते आपापल्या मार्गाने निघून गेले. मात्र, या भेटीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.










