डॉक्टरवर जीवापाड प्रेम केलं, पण शेवटी जातीमुळे लग्नास नकार, महिला सर्जनची विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या
Crime News Telangana : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 जानेवारी रोजी सिद्धिपेट येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहात ही घटना घडली. संबंधित तरुणीने हर्बीसाइड अर्थात तणनाशक रसायनाचे इंजेक्शन स्वतःला टोचून घेतले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
डॉक्टरवर जीवापाड प्रेम केलं, पण शेवटी जातीमुळे लग्नास नकार,
महिला सर्जनची विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या
Crime News : तेलंगणाच्या सिद्धिपेट जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत असलेल्या 23 वर्षीय सर्जन (डॉक्टर) तरुणीच्या कथित आत्महत्येच्या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली आहे. लग्नाचे आमिष दाखवून नंतर जातीय कारणांवरून नकार दिल्यामुळे मानसिक तणावात सापडून तरुणीने टोकाचे पाऊल उचलल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी वरिष्ठ निवासी डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असून, घटनेचा सखोल तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 जानेवारी रोजी सिद्धिपेट येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहात ही घटना घडली. संबंधित तरुणीने हर्बीसाइड अर्थात तणनाशक रसायनाचे इंजेक्शन स्वतःला टोचून घेतले. त्यानंतर ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. वसतिगृहातील मैत्रिणींना ही बाब लक्षात येताच त्यांनी तातडीने तिला सिद्धिपेटमधील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर झाल्याने पुढील उपचारांसाठी तिला हैदराबाद येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. उपचार सुरू असतानाच 4 जानेवारीच्या पहाटे तिचा मृत्यू झाला.
हेही वाचा : बीड : मानलेल्या भावास आत्महत्येपासून रोखताना प्राध्यापक मडॅम 80 टक्के भाजल्या, अशा अवस्थेही जबाब दिला
या प्रकरणी मृत तरुणीच्या बहिणीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, संबंधित वरिष्ठ निवासी डॉक्टरने तरुणीशी प्रेमसंबंध ठेवून तिला लग्नाचे आश्वासन दिले होते. मात्र नंतर जातीय कारणांचा दाखला देत लग्नास नकार दिला. या अपमानामुळे आणि मानसिक छळामुळे तरुणी प्रचंड तणावात होती, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.










