Video: ज्याने मोबाईल चोरला,त्याच्याच प्रेमात पडली!तरूणीच्या लव्हस्टोरीची एकच चर्चा
एक अनोखी लव्हस्टोरी (Lovestory) समोर आली आहे.या लव्हस्टोरीत एक तरूणी मोबाईल चोरी करणाऱ्या एका तरूणाच्या प्रेमात पडली आहे. ज्य़ा तरूणाने तिचा मोबाईल हिसकावला होता, त्या तरूणाच्या प्रेमात ही तरूणी पडली आहे, त्यामुळे आश्चर्य व्यक्त होतं आहे.
ADVERTISEMENT
सीमा हैदर आणि सचिन मीना असो किंवा राजस्थानमधून पाकिस्तानात गेलेली अंजू असो, या दोन्ही लव्हस्टोरीची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. असे असतानाच आता एक अनोखी लव्हस्टोरी (Lovestory) समोर आली आहे.या लव्हस्टोरीत एक तरूणी मोबाईल चोरी करणाऱ्या एका तरूणाच्या प्रेमात पडली आहे. ज्य़ा तरूणाने तिचा मोबाईल हिसकावला होता, त्या तरूणाच्या प्रेमात ही तरूणी पडली आहे, त्यामुळे आश्चर्य व्यक्त होतं आहे. या लव्हस्टोरीची आता सोशल मीडियावर (social media) चर्चा रंगली आहे. (girl fell in love with mobile thief love story viral in social media)
ADVERTISEMENT
सोशल मीडियावर सध्या एका लव्हस्टोरीची चर्चा आहे. या लव्हस्टोरीत एक तरूण चोरी करता करता एका तरूणीचे हदय चोरून घेऊन गेला आहे. त्याचं झालं असं की हा तरूण मोबाईल चोर होता. रस्त्यावरील नागरीकांचे मोबाईल हिसकावून ते विकायचे. अशाच एका रस्त्यावरून चालणाऱ्या तरूणीचा त्याने मोबाईल हिसकावला होता. मात्र नंतर त्याला या घटनेचा पश्चाताप झाला आणि त्याने हा मोबाईल परत केला होता. या घटनेनंतर दोघांची लव्हस्टोरी सुरू झाली होती.
हे ही वाचा : धक्कादायक! ऑनलाईन AK-47 मागवली, नंतर 8 वर्षीय मुलाने घरातच…
ट्विटरवर @Miltonneves नावाच्या अकाऊंटवर ब्राजीली कपलचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत दोघांनी आपली लव्हस्टोरी सांगितली आहे. तु्म्ही दोघे कसे भेटलात? असा सवाल तरूणीला करण्यात आला होता? यावर तरूणी म्हणते, मी रस्त्यावर चालत होते, त्यावेळेस त्याने माझ्या हातातला मोबाईल हिसकावून पळ काढला होता. मात्र त्याच्यानंतर त्याने पुन्हा माझा फोन परत केला होता. त्यामुळे चोराच्या प्रामाणिकपणाने मला खूप प्रभावित केले होते, असे तरूणीने सांगते.
हे वाचलं का?
É só no Brasil mesmo….kkkkkkkkkkk. pic.twitter.com/EmrqKfUzZM
— Milton Neves (@Miltonneves) July 21, 2023
मोबाईल चोरणाऱ्या मुलाने सांगितले की, मी खूप वाईट परिस्थितीतून जात होतो. माझी कोणतीच मुलगी मैत्रीण नव्हती.ज्यावेळेस मी चोरी केलेल्या फोनवर तरूणीचे फोटो पाहिले,त्याक्षणी मी तिच्या प्रेमात पडलो आणि तिचा फोन परत करण्याचा निर्णय घेतला. तसेच तरूणीला मोबाईल परत करताना सांगितले की,मला मोबाईल चोरी केल्याचा पश्चाताप होतो आहे. मी स्वत:लाच सांगितले की, दरदिवशी इतकी सुंदर मुलगी पाहत नाही. आणि त्यानंतर तरूणीला मोबाईल परत करत तिची माफी मागितली.
ADVERTISEMENT
फोन चोरता चोरता हृदय ही चोरलेस का असा सवाल तिला विचारण्यात आला होता. यावर तरूणाने उत्तर दिले, हा असेच समजा. दरम्यान इमेनुएला आणि मुलगा गेल्या दोन वर्षापासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यांच्या या नात्य़ाला आता आई-वडील स्विकारतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : एकमेकींना जमिनीवर पाडलं,सासू-सूनेने झिंज्या उपटल्या, मुलगा व्हिडिओ…
या कपलची ही स्टोरी पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. या व्हिडिओला अडीच लाखांहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर लाईक आणि कमेंट केले आहे. प्रेम कधीही कुणासोबतही होऊ शकते, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. हे प्रॅंक तर नाही? असा सवाल दुसऱ्या नेटकऱ्याने केला आहे. चांगली गोष्ट असेल जर तरूणाने चोरी सोडली असेल,असे एका तिसऱ्या नेटकऱ्याने म्हटले आहे.या लव्हस्टोरीची आता चर्चा आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT