Govt Jobs : कॉमर्सची पदवी असलेल्या उमेदवारांसाठी खुशखबर, भारत सरकारमध्ये नोकरीची संधी; 'असा' करा अर्ज

मुंबई तक

भारतीय रेल्वे वित्त महामंडळात भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. सरकारी नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी उत्तम संधी चालून आली आहे.

ADVERTISEMENT

Government Job
Government Job
google news

बातम्या हायलाइट

point

कॉमर्सची पदवी असलेल्या उमेदवारांसाठी खुशखबर

point

भारत सरकारमध्ये नोकरीची संधी

point

'असा' करा अर्ज

Govt Jobs : भारतीय रेल्वे वित्त महामंडळ (IRFC) अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 23 जागा भरल्या जाणार असून, यामध्ये 'असिस्टंट' पदाच्या 16 आणि 'असिस्टंट मॅनेजर (फायनान्स)' पदाच्या 7 जागांचा समावेश आहे. रेल्वे विभागात करिअर करण्याची इच्छा असलेल्या आणि वित्त क्षेत्रातील शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.

शैक्षणिक पात्रता

या पदांसाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक पात्रतेनुसार, 'असिस्टंट' पदासाठी उमेदवाराकडे 60% गुणांसह बी.कॉम पदवी आणि ICAI किंवा ICMAI कडून घेतलेली मध्यवर्ती परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 'असिस्टंट मॅनेजर (फायनान्स)' या पदासाठी बी.कॉम सह CA/CMA किंवा MBA (फायनान्स) किंवा संबंधित विषयातील पदव्युत्तर डिप्लोमा असणे अनिवार्य आहे. वयाची अट 1 जानेवारी 2026 रोजी 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावी, तर नियमानुसार अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गासाठी 5 वर्षे आणि ओबीसी प्रवर्गासाठी 3 वर्षांची सवलत देण्यात आली आहे.

हे ही वाचा : मुंबईची खबर : म्हाडाकडून लवकरच 900 घरांसाठी लॉटरी, आता मुंबईत 'या' ठिकाणी मिळणार हक्काचं घर

कधी होणार परीक्षा?

भरतीसाठी अर्जाचे शुल्क सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांसाठी 500 रुपये निश्चित करण्यात आले आहे, तर अनुसूचित जाती, जमाती, माजी सैनिक आणि ट्रान्सजेंडर उमेदवारांना शुल्कातून पूर्ण सूट देण्यात आली आहे. निवड झालेल्या उमेदवारांना नवी दिल्ली किंवा भारतामध्ये कोठेही नियुक्ती दिली जाऊ शकते. या पदांसाठीची निवड प्रक्रिया परीक्षेच्या माध्यमातून पार पडणार असून, ही परीक्षा जून 2026 मध्ये होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा : Labh Drishti Yog 2026: शुक्र आणि शनीमुळे लवकरच लाभ दृष्टी योग, 'या' 4 राशी होणार मालामाल!

'ही' आहे शेवटची तारीख

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 मे 2026 रोजी रात्री 11:45 वाजेपर्यंत आहे. शेवटच्या क्षणी होणारी तांत्रिक अडचण टाळण्यासाठी उमेदवारांनी मुदतीपूर्वीच आपले अर्ज आणि शुल्क सादर करावे, असे आवाहन महामंडळाकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
 

हे वाचलं का?