CM एकनाथ शिंदेंची किती आहे जमीन?, पाहा सात-बारावर कोणाकोणाची आहेत नावं..

रोहित गोळे

CM Eknath Shinde Agricultural Land: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शेतीत रमणारे अशी त्यांची ओळख आहे. पण मुख्यमंत्री शिंदे यांची नेमकी किती जमीन आहे आणि त्यांच्या सात-बारा उताऱ्यावर नेमकी कोणाकोणाची नावं आहेत हे आम्ही आपल्याला सांगणार आहोत.

ADVERTISEMENT

how much land does cm eknath shinde have see whos name is on the satbara utara
how much land does cm eknath shinde have see whos name is on the satbara utara
Google CTA

CM Eknath Shinde Land: मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या महाराष्ट्रातील सर्वात चर्चेत असणार नावं आहे. शिवसेनेत केलेलं बंड.. मुख्यमंत्री पद आणि शिवसेना पक्षच स्वत:कडे राखणारं नेतृत्व अशी अत्यंत चर्चेत राहणारी कामगिरी त्यांनी गेल्या दीड वर्षात केली आहे. मुख्यमंत्री असतानाही कार्यकर्ता आणि शेतकरी ही त्यांनी आपली ओळख जपण्याचा देखील प्रयत्न केला आहे. (how much land does cm eknath shinde have see whos name is on the satbara utara)

खरं तर एकनाथ शिंदे यांची बहुतांश कारकीर्द आणि राजकीय जडणघडण ही ठाण्यातच झाली. शिवसेनेचे तडफदार नेते स्वर्गीय आनंद दिघे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत आपला ठसा उमटवणारे एकनाथ शिंदे हे मूळचे सातारा जिल्ह्यातील दरे तांब या गावातील आहेत.

कोयनेच्या पात्राजवळील हे गाव आहे. तसं पाहिल्यास हे गाव पाण्याचा दृष्टीने अत्यंत समृद्ध आहे. प्रचंड पर्जन्यवृष्टी आणि कोयनेसारखी जलवाहिनी ही या गावासाठी एक वरदानच ठरली आहे. त्यामुळेच येथे शेतीसाठी अत्यंत सुपीक अशी जमीन आहे. त्यामुळे इथे शेती करण्याचा मोह स्वत: मुख्यमंत्री महोदयांना देखील रोखता येत नाही.

हे ही वाचा>> ‘पळून गेलेले सगळे लोकशाहीद्रोही’, नार्वेकरांच्या निकालावर सरोदेंचं कायदेशीर स्पष्टीकरण

आपल्या व्यस्त कार्यक्रमातून दोन-तीन दिवसांचा वेळ काढून मुख्यमंत्री शिंदे हे दरे या आपल्या गावी तीन-चार महिन्यातून एकदा तरी चक्कर टाकताच. यावेळी ते आपल्या शेतीत रमतात, तेथील कामं करतात.. हे आपल्याला अनेकदा त्यांनीच सोशल मीडियावर अपलोड केलेल्या फोटो आणि व्हीडिओमधून पाहायला मिळतं.