हा वैभव सूर्यवंशी कहरच आहे, बाकी काही नाही... अवघ्या 52 चेंडूत ठोकल्या 200 धावा!
वैभव सूर्यवंशी आता लिस्ट A क्रिकेटमध्ये सर्वात जलद द्विशतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे. त्याने युएईविरुद्ध केवळ 52 चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले आणि सामन्यात षटकार व चौकारांची उधळण केली.
ADVERTISEMENT

दोहा (UAE): एसीसी मेन्स एशिया कप रायझिंग स्टार्स 2026 मध्ये भारत 'A' संघ मंगळवारी (24 नोव्हेंबर) संयुक्त अरब अमिराती (यूएई) विरुद्ध खेळला. जिथे 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने फलंदाजी करताना अक्षरश: धुमाकूळ घातला.
'बेबी बॉस' वैभव सूर्यवंशीने भारत 'A' संघासाठी केवळ 52 चेंडूंमध्ये आपले द्विशतक पूर्ण केले. लिस्ट ए क्रिकेटच्या इतिहासातील हे सर्वात जलद द्विशतक ठरले आहे. वैभवने 53 चेंडूंमध्ये 28 षटकार आणि 7 चौकारांसह 204 धावा केल्या. व्यावसायिक क्रिकेट सामन्यात एखाद्या फलंदाजाने इतके षटकार मारण्याची ही पहिलीच वेळ आहे.
लिस्ट A क्रिकेटमधील सर्वात जलद द्विशतक (चेंडूंनुसार)
- 52 चेंडू - वैभव सूर्यवंशी, भारत 'A' विरुद्ध यूएई, 2026
- 103 चेंडू - चॅड बोव्स, कँटरबरी विरुद्ध ओटागो, क्राइस्टचर्च, 2024
- 114 चेंडू - एन. जगदीसन, तामिळनाडू विरुद्ध अरुणाचल, बंगळूर, 2022
- 114 चेंडू - हॅरी ब्रूक, इंग्लंड विरुद्ध श्रीलंका, रावळपिंडी, 2026
हे ही वाचा>> सिराजला वगळल्याने रणकंदन; रवी शास्त्री, गावस्कर भडकले, तर काँग्रेस खासदाराच्या आरोपाने वादाला राजकीय रंग
व्यावसायिक क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक षटकार
- 28 षटकार - वैभव सूर्यवंशी, भारत 'A' विरुद्ध यूएई, 2026
- 26 षटकार - तन्मय अग्रवाल, हैदराबाद विरुद्ध अरुणाचल, हैदराबाद, 2024 (रणजी)
- 23 षटकार - कॉलिन मुन्रो, ऑकलंड विरुद्ध सेंट्रल डिस्ट्रिक्ट्स, नेपियर, 2015 (प्लंकेट शील्ड)
- 23 षटकार - डार्सी शॉर्ट, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विरुद्ध क्वीन्सलँड, सिडनी, 2018 (वन डे कप)
अवघ्या 28 चेंडूत झळकावलं शतक
वैभव सूर्यवंशीने 14 षटकार आणि चार चौकार ठोकत अवघ्या 28 चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले, जे लिस्ट A क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जलद शतक ठरले आहे. त्याने जेक फ्रेझर-मॅकगर्कचा विक्रम मोडला, ज्याने 2023 मध्ये दक्षिण ऑस्ट्रेलियाकडून टास्मानियाविरुद्ध अवघ्या 29 चेंडूंमध्ये शतक झळकावले होते.
हे ही वाचा>> Sachin Tendulkar meets Vinod Kambli : स्टेजवर विनोद कांबळीला पाहताच भेटायला गेला 'सचिन'; राज ठाकरेंनी...
लिस्ट A मधील सर्वात जलद शतके (चेंडूंनुसार)
- 28 चेंडूत शतक - वैभव सूर्यवंशी, इंडिया A विरुद्ध यूएई 2026
- 29 चेंडूत शतक - जेक फ्रेझर-मॅकगर्क, दक्षिण ऑस्ट्रेलिया विरुद्ध टास्मानिया, अॅडलेड 2023
- 31 चेंडूत शतक - एबी डिव्हिलियर्स, दक्षिण ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज, जोहान्सबर्ग 2015
- 32 चेंडूत शतक - साकिबुल गनी, बिहार विरुद्ध अरुणाचल, रांची 2025
- 33 चेंडूत शतक - इशान किशन, झारखंड विरुद्ध कर्नाटक, अहमदाबाद 2025
वैभव सूर्यवंशीने इंडिया A च्या डावाच्या पहिल्याच षटकात झाहिद अलीच्या गोलंदाजीवर सलग तीन षटकार मारून आपला इरादा स्पष्ट केला. त्यानंतर त्याने पुढच्याच षटकात इब्रार अहमदच्या गोलंदाजीवर दोन षटकार आणि एक चौकार मारला. पुढचे षटक यूएईच्या बासिल हमीदने टाकले, ज्यात वैभवने तीन षटकार मारून आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने आठ षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने 16 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. वैभव तिथेच थांबला नाही आणि त्याने विक्रम मोडणारी खेळी खेळली.
इंडिया A प्लेइंग इलेव्हन: वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, प्रभसिमरन सिंग, तिलक वर्मा (कर्णधार), कुमार कुशाग्रा (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, सूर्यांश शेडगे, शाहबाज अहमद, हर्ष दुबे, हर्षित राणा आणि अर्शद खान.
UAE प्लेइंग इलेव्हन: आर्यांश शर्मा, अंश टंडन, हरप्रीत सिंग भाटिया, मोहम्मद शहदाद, एम आफताब आलम (यष्टीरक्षक), बासिल हमीद (कर्णधार), एथन डिसोझा, उदीश सुरी, इब्रार अहमद, सिमरनजीत सिंग आणि झाहिद अली.
