'मुलाला वापरले जातीवरून नको ते शब्द, 'त्या' दोन प्राध्यापकांना...'. साहिल वाकडेच्या वडिलांचे गंभीर आरोप

दिव्येश सिंह

आयआयटी बॉम्बेतील साहिल वाकोडे याच्या मृत्यूनंतर वडिलांनी जातीय भेदभाव आणि मानसिक छळाचे आरोप केले आहेत. आता त्यांनी या प्रकरणी प्राध्यापक आणि संचालकांच्या अटकेची मागणीही केली आहे.

ADVERTISEMENT

iit bombay sahil wakode father alleges caste discrimination harassment
साहिल वाकडेच्या वडिलांचे गंभीर आरोप
Google CTA

मुंबई: मुंबईतील आयआयटी बॉम्बेमधील विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या मृत्यूनंतर संस्थेतील कथित जातीय भेदभाव आणि छळाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. साहिलच्या वडिलांनी प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले असून, त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा करत आहे. 

साहिलच्या वडिलांचे गंभीर आरोप

साहिलच्या वडिलांनी आरोप केला आहे की, त्यांच्या मुलाला आयआयटी बॉम्बेमध्ये जातीय भेदभावाचा सामना करावा लागला. प्राध्यापकांकडून जातीवरून अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणात प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला आणि आयआयटी बॉम्बेचे संचालक शिरीष केदारे यांच्या अटकेची मागणी साहिलच्या पालकांनी केली आहे.

हे ही वाचा>> छळ की AI कॉपी ? वर्गात टॉपर तरी साहिल वाकोडेने आत्महत्या का केली?

परीक्षेतील घटनेनंतर साहिलचा मृत्यू

साहिल वाकोडे हा आयआयटी बॉम्बेमध्ये शिक्षण घेत होता. परीक्षेदरम्यान मोबाईल वापरल्याच्या संशयावरून त्याला परीक्षा कक्षातून बाहेर जाण्यास सांगण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेनंतर साहिलचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूमागील परिस्थिती आणि त्याआधी घडलेल्या घटनांचा तपास सुरू आहे.