अखेर चीनला मागे टाकलेच! भारत बनला जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश

मुंबई तक

संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे.

ADVERTISEMENT

India has become the most populous country in the world according to United Nations data.
India has become the most populous country in the world according to United Nations data.
social share
google news

लोकसंख्येच्या बाबतीत भारताने आता चीनलाही मागे टाकले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. आज घडीला भारताची लोकसंख्या 142.86 कोटी झाली आहे तर चीनची लोकसंख्या 142.57 कोटी झाली आहे. याचा अर्थ चीनपेक्षा भारताची लोकसंख्या 29 लाखांनी जास्त आहे. 1950 नंतर पहिल्यांदाच भारताच्या लोकसंख्येने चीनला मागे टाकले आहे. गेल्यावर्षीच संयुक्त राष्ट्राने भारत लोकसंख्येच्या बाबतीत चीन मागे टाकेल असा अंदाज वर्तविला होता, तो आता खरा ठरला आहे. (India has become the most populous country in the world according to United Nations data)

या संदर्भात, NFPA च्या ‘द स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट, 2023’ ने बुधवारी आपला अहवाल प्रसिद्ध केला आहे. ‘8 बिलियन लाइव्ह, इनफिनिट पॉसिबिलिटीज: द केस फॉर राइट्स अँड चॉइस’. असं या अहवालाचे नाव आहे. हे आकडे ‘डेमोग्राफिक इंडिकेटर्स’ या श्रेणीत दिलेले आहेत.

मारेकरी अतीक आणि अशरफच्या डोक्यात गोळ्या झाडताना ‘तो’ चौथा व्यक्तीही होता हजर?

UNFPA च्या माध्यम सल्लागार अण्णा जेफरीज म्हणाल्या, “खरेतर दोन्ही देशांची तुलना करणे खूप कठीण आहे. कारण दोन्ही देशांच्या डेटा कलेक्शनमध्ये थोडाफार फरक आहे. चीनची लोकसंख्या गेल्या वर्षी उच्चांकावर पोहोचली होती आणि आता ती कमी होऊ लागली आहे, हे या अहवालात स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर भारताची लोकसंख्या सध्या वाढत आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे, भारताच्या लोकसंख्येच्या वाढीचा दर 1980 पासून घसरत आहे. याचाच अर्थ भारताची लोकसंख्या वाढत आहे पण या वाढीचा दर आता पूर्वीच्या तुलनेत कमी झाला आहे.

भारतात या वयोगटातील लोकसंख्या सर्वाधिक :

भारतातील 25 टक्के लोकसंख्या 0 ते 14 वर्षांच्या दरम्यान असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय 18 टक्के लोकसंख्या 10 ते 19 वयोगटातील आहेत. 10 ते 24 वयोगटातील लोकांची संख्या 26 टक्के आहे. याशिवाय 15 ते 64 वर्षे वयोगटातील लोकसंख्या 68 टक्के आहे आणि 7 टक्के लोकसंख्या 65 च्या वर आहेत. चीनबद्दल बोलायचे झाल्यास, 17% 0 ते 14 वर्षे, 12% 10 ते 19, 18% 10 ते 24 वर्षे , 69% 15 ते 64 वर्षे आणि 65 वरील लोकांची संख्या 14% आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp