Viral Video: गणपतीच्या सोंडेजवळ अचानक आला जिवंत साप अन् पुढे जे घडलं...
Tirupati Viral Video : गणेशोत्सवाची धामधूम सुरु असतानाच एक व्हायरल व्हिडीओनं खळबळ उडाली आहे. आज दहा दिवसांच्या गणपतीचा विसर्जन सोहळ पार पडत आहे. पण सापाच्या एका व्हिडीओनं अनेकांचा थरकाप उडवला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
गणेश मंडळात अचानक साप आला अन् जे घडलं...
गणपती मूर्तीजवळ साप आल्यानंतर नेमकं काय घडलं?
सापाचा हा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
Tirupati Viral Video : गणेशोत्सवाची धामधूम सुरु असतानाच एक व्हायरल व्हिडीओनं खळबळ उडाली आहे. आज दहा दिवसांच्या गणपतीचा विसर्जन सोहळ पार पडत आहे. पण सापाच्या एका व्हिडीओनं अनेकांचा थरकाप उडवला आहे. गणपती मूर्तीजवळ एक जिवंत साप फिरत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. साप गणपतीच्या सोंडेजवळ गेल्यावर पुढे जे काही घडलं ते पाहिल्यावर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. आंध्रप्रदेशच्या तिरुपती येथे सर्वांना थक्क करणारा प्रकार घडला आहे. (A video of a live snake moving near the Ganpati idol has surfaced. You will be surprised when you see what happens next)
व्हायरल झालेल्या व्हिडीओत पाहू शकता की, गणपती बाप्पाच्या सुंदर मूर्तीजवळ एक भयानक साप फिरत असतो. हा साप बाप्पाच्या मूर्तीवर बिंधास्तपणे फिरत असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. साप गणपती मूर्तीवर फिरत असताना आजूबाजूला असलेल्या गणेश भक्तांनी हा व्हिडीओ कॅमेरात कैद केला आहे. सापाचा हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर करण्यात आला आहे.
हे ही वाचा >> Tree Optical Illusion : फोटोत झाडे दिसतात? एक स्त्री सुद्धा लपलीय, क्लिक करून पाहा
इथे पाहा गणपती मूर्तीजवळ आलेल्या सापाचा थरारक व्हिडीओ
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
सापाचा हा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला असून आतापर्यंत या व्हिडीओला 5 मिलियनहून अधिक व्यूज मिळाले आहेत. आरके रोहिथ नावाच्या एका इन्स्टाग्राम यूजरने सापाचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. तिरुपतीच्या रेल्वे कॉलनीत असलेल्या एका गणेश मंडळात हा साप गणपती चरणी आल्याचं पाहायला मिळालं. हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलंय की, 'गणेश महाराज की जय...'
हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो 'या' गोष्टी अजिबात विसरू नका! झटपट जमा होतील 4500 रुपये
गणेश मंडळात साप आल्यानंतर सर्वांचाच थरकाप उडाला. विशेष म्हणजे हा साप गणपती मूर्तीजवळ गेल्यावर सर्वांच्याच भुवया उंचावल्या. साप गणपती बाप्पाच्या मूर्तीजवळ गेल्यावर कशाप्रकारे वावरतो, हे पाहून अनेकांना धक्काच बसला आहे. सापाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त करत भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. या व्हिडीओला लाखोंच्या संख्येत लाईक्सही मिळाले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT