Adani, Ambani यांना टक्कर देणारे जे.पी. टपारिया आहेत तरी कोण?

मुंबई तक

ADVERTISEMENT

JP Taparia, owner of Fami Care Group, has bought the country's most expensive house in Mumbai, The price of this house is around Rs 369 crore
JP Taparia, owner of Fami Care Group, has bought the country's most expensive house in Mumbai, The price of this house is around Rs 369 crore
social share
google news

India’s most expensive house deal :

ADVERTISEMENT

देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरात देशातील सर्वात महागडे घर विकले गेले आहे. या घराची किंमत आहे तब्बल 369 कोटी रुपये. मलबार हिल भागात असलेल्या या सी फेसिंग अपार्टमेंट एवढे पैसे आजपर्यंत कोणत्याही घराला मिळाले नव्हते. फायनान्शिअल एक्सप्रेसच्या बातमीनुसार, भारतातील अपार्टमेंटसाठीचा आजपर्यंतचा हा सर्वात महागडा व्यवहार आहे. (JP Taparia, owner of Fami Care Group, has bought the country’s most expensive house in Mumbai, The price of this house is around Rs 369 crore)

कोणी खरेदी केली ही अपार्टमेंट?

फॅमी केअर ग्रुपचे मालक जेपी टपरिया यांच्या कुटुंबाने हे अपार्टमेंट लोढा ग्रुपकडून विकत घेतले आहे. लोढा मलबार टॉवरच्या 26व्या, 27व्या आणि 28व्या मजल्यावर हे अपार्टमेंट आहे. रिपोर्ट्सनुसार, या अपार्टमेंटमधून समोर थेट अरबी समुद्र दिसतो. या टॉवरमध्ये हँगिंग गार्डनही आहे. हे अपार्टमेंट 27,160 स्क्वेअर फूटमध्ये पसरले आहे. म्हणजेच, प्रति स्क्वेअर फूटची किंमत मोजली तर ती 1 लाख 36 रुपयांच्या घरात आहे. याचमुळे हे अपार्टमेंट देशातील सर्वात महाग व्यवहारापैकी एक बनलं आहे. या अपार्टमेंटसाठी मुद्रांक शुल्क म्हणून तब्बल 19.07 कोटी रुपये भरल्याची माहिती आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : अंबानी-अदाणी नाही तर या उद्योगपतीने घेतला देशातील सर्वात महाग फ्लॅट

कोण आहेत जेपी टपरिया?

उद्योगपती जेपी टपारिया हे हेल्थकेअर कंपनी फॅमी केअरचे संस्थापक आहेत. कॉपर-टी हे गर्भनिरोधक यंत्र जगभरात बनवण्यात ही कंपनी आघाडीवर आहे. फोर्ब्सच्या मते, जगातील 15 टक्के महिला तोंडावाटे ज्या गर्भनिरोधक गोळ्या घेतात त्या फॅमी केअरची उत्पादने असतात. 1990 पर्यंत, टपरिया हे त्यांच्या कुटुंबाच्या हॅंड टूल्स आणि इंजिनिअरींगच्या व्यवसायात होते. यानंतर त्यांनी आपला व्यवसाय सुरू केला आणि हळूहळू महिलांसाठी तोंडी गर्भनिरोधक बनवणारी सर्वात मोठी कंपनी बनवली. टपरिया यांची अनंत कॅपिटल, स्प्रिंगवेल आणि गार्डियन फार्मसी या कंपन्यांमध्ये भागीदारी आहे.

हेही वाचा : अरेच्चा! AI चॅटबॉटसोबत व्यक्तीने थाटला संसार, सांगितली अजबगजब प्रेम कहाणी!

13 मार्च रोजी बजाज ऑटोचे चेअरमन नीरज बजाज यांनी दक्षिण मुंबईतील वाळकेश्वर येथे 252.5 कोटी रुपयांना ट्रिपलेक्स पेंटहाऊस खरेदी केले. हे अपार्टमेंट 18,008 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेले आहे. यासाठी त्यांनी 15.15 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क भरले होते. फेब्रुवारीमध्ये, वेलस्पन समूहाचे अध्यक्ष बीके गोयंका यांनी वरळी येथे ओबेरॉय रिअल्टीच्या लक्झरी प्रोजेक्ट थ्री सिक्स्टी वेस्टमध्ये 230 कोटी रुपयांना पेंटहाऊस खरेदी केले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT