Maharashtra Bhushan : 14 श्री सदस्यांच्या मृत्यूचं कारण आलं अखेर समोर
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात मृत्यु झालेल्या व्यक्ती 6 ते 7 तासांपासून उपाशी होत्या. त्यातील काहींनी अनेक तासांपासून अन्नाबरोबर पाणीही पिलेलं नव्हतं, असं आता पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधून समोर आलं आहे.
ADVERTISEMENT

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना प्रदान करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या श्री सदस्यांपैकी 14 जणांचा मृत्यू झाला आहे. सरकारच्या मोठ्या कार्यक्रमात 14 लोकांच्या मृत्यूने सरकार टीकेचे धनी ठरले असून, श्री सदस्यांचे मृत्यू नेमके कशामुळे झाले? असा प्रश्न सातत्याने उपस्थित होत आहे. आता या प्रकरणातील माहिती समोर आली असून, पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधून मृत्यूच्या कारणाचा खुलासा झाला आहे.
‘द इंडियन एक्स्प्रेस’ या इंग्रजी दैनिकाने खारघर येथील कार्यक्रमानंतर मृत्यू झालेल्या 14 श्री सदस्यांच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्ट संदर्भातील वृत्त दिलं आहे.
आप्पासाहेब धर्माधिकारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यानंतर उष्माघाताने मृत्यू झालेल्या 14 पैकी 12 जणांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन (पोस्टमॉर्टेम) करण्यात आले. 12 मृतदेह पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. सोमवारी या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं.
हेही वाचा >> आप्पासाहेब धर्माधिकारींच्या ‘श्री समर्थ बैठकी’त नेमकी काय मिळते शिकवण?
पोस्टमॉर्टेम रिपोर्टनुसार 12 मृत व्यक्तीची पोटं रिकामी होती. त्यातील दोन जणांनी अन्नाबरोबर पाणीही पिलं होतं की नाही, हे स्पष्ट कळू शकलं नाही.