Maharashtra Board HSC Result 2023: ..तर तुम्हाला 12वीचा निकाल पाहता येणार नाही!
Maharashtra Board HSC Roll Number: बारावीचा निकाल हा ऑनलाइन जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे आपल्याला निकाल पाहण्यासाठी रोल नंबरची हा अत्यंत आवश्यक ठरणार आहे.
ADVERTISEMENT
Maharashtra Board HSC Roll Number, MSBSHSE 12th Result 2023: मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) 12वीचा निकाल 25 मे 2023 रोजी दुपारी 2 वाजता ऑनलाइन जाहीर केला जाणार आहे. बारावीचा निकाल केव्हा जाहीर केला जाणार याबाबत विद्यार्थ्यांना अनेक दिवसांपासून उत्सुकता लागून राहिली होती. अखेर आज (24 मे) निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. (maharashtra board hsc result 2023 Roll number is going to be very important to check 12th result)
ADVERTISEMENT
बारावीचा निकाल हा ऑनलाइन जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे आपल्याला निकाल पाहण्यासाठी रोल नंबरची गरज असणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी जे रोल नंबर देण्यात आले होते तेच त्यांना ऑनलाइन निकाल पाहण्यासाठी वापरावे लागणार आहेत. महाराष्ट्र बोर्डाच्या 12वी परीक्षेसाठी नोंदणी केलेले विद्यार्थी अधिकृत वेबसाइटवर mh-hsc.ac.in वरुन देखील आपला रोल नंबर डाऊनलोड करु शकतात.
Maharashtra Board 12th Roll Number: असा डाऊनलोड करा आपला रोल नंबर
1. mh-hsc.ac.in या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करा.
हे वाचलं का?
2. मागितलेली माहिती तिथे भरा.
3. तुमचं पूर्ण नाव टाका आणि सर्च बटणावर क्लिक करा.
ADVERTISEMENT
4. रोल नंबर स्क्रीनवर येईल. त्यानंतर आपण तो डाउनलोड करु शकता.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Hingoli Crime: वडिलांचे हात-पाय बांधले अन् नराधमाने आईवरच केला बलात्कार
HSC Result 2023 – निकाल कसा पाहता येईल?
- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ हे बारावी (HSC) या बोर्ड परीक्षांचे निकाल mahahsscboard.in यावर जाहीर करणार आहे.
- सगळ्यात आधी MSBSHSEच्या Mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन
- होम पेजवर असलेल्या महाराष्ट्र बारावीचा निकाल 2023 या लिंकवर क्लिक करा.
- लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर रिझल्ट पेज सुरु होईल.
- यावेळी विद्यार्थ्यांना त्यांचा जो रोल नंबर दिला असेल तो टाकावा लागेल.
- त्यानंतर खालच्या टॅबमध्ये विद्यार्थ्यांना आपल्या आईच्या नावाचे पहिले तीन अक्षर टाकावे लागणार आहे आणि त्यानंतरच त्यांना SUBMIT हे बटण दाबावं लागणार आहे.
- समजा, तुमचा सीट नंबर M574841 असेल आणि तुमच्या आईचे नाव ‘पूजा’ असं असेल तर तुम्ही M574841 हा तुमचा सीट नंबर टाकून पुढच्या बॉक्समध्ये आईच्या नावाची पहिली तीन अक्षरे म्हणजेच PUJ असं टाकावं लागेल.
- त्यानंतर SUBMIT या बटणावर क्लिक करा आणि आपला निकाल काही क्षणात आपल्याला दिसेल.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT